सोलापूर : बाजार समितीवर प्रशासकाच्या हालचाली

चौकशीसाठी आठजणांचे पथक; सहकारमंत्र्यांकडून सुरू झाली कार्यवाही
balasaheb patil
balasaheb patilsakal
Updated on

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये(solapur Agricultural Produce Market Committee) गैरकारभार झाल्याची तक्रार सूर्यकांत व्हनमाने व बसवराज माळगे यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली. या तक्रारीवर प्रशासक नियुक्तीची कार्यवाही करण्याची सूचना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील(Co-operation Minister Balasaheb Patil) यांनी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांना केली. बाजार समितीच्या चौकशीसाठी तीन अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. तीन अधिकाऱ्यांनी मदतीसाठी पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. बाजार समितीच्या कारभारावर उपस्थित केलेल्या ३२ मुद्यांवरील चौकशीचा अहवाल आता जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांना सादर केला जाणार आहे.(Movement of deployed the Administrator on the Market Committee says minister balasaheb patil)

सहकारमंत्री पाटील यांनी दिलेल्या सूचनेनूसार जिल्हा उपनिबंधक भोळे यांनी तीन अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. त्यामध्ये सहकार विभागाचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक विष्णू डोके हे पथक प्रमुख आहेत. त्यांच्या मदतीला सहाय्यक विशेष लेखापरीक्षक बी. सी. पवार व सहाय्यक विशेष लेखापरीक्षक आर. एस. नागुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या तीन अधिकाऱ्यांनी त्यांच्या मदतीसाठी विशेष लेखापरीक्षक कार्यालयातील पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. बाजार समितीच्या कारभारावर झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने हे आठ अधिकारी व कर्मचारी चौकशी करुन अहवाल देणार आहेत.

balasaheb patil
Solapur : गेल्या वर्षात 665 जण बेपत्ता! 154 महिला सापडल्याच नाहीत

काही भाडेपट्टाधारक/अडते/व्यापारी यांनी समितीच्या मालमत्ता पत्रकात पट्टेदार म्हणून नोंदणी करताना समितीची मंजुरी घेतली नाही, काही प्लॉटधारकांनी त्यांच्या भागीपत्रकातील भागधारकांच्या बदलांची नोंदी समितीच्या मंजुरीशिवाय मालमत्ता पत्रकात करून घेतल्या आहेत, समितीकडून लिजवर घेतलेल्या जागांवर काही प्लॉटधारकांनी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले असून कर्ज घेताना संबंधितांनी व वित्तीय संस्थांनी समितीची मंजुरी घेतली नाही व समितीच्या मालमत्ता पत्रकात बोजाची नोंद केली आहे. काही प्लॉटधारकांनी समितीच्या जागा खरेदी केल्याचे मालमत्ता पत्रकात दिसून येते. काही भाडेपट्टा प्लॉटवर बॅंकांनी जप्तीचा आदेश बजावला आहे व मालमत्ता पत्रकात त्याची नोंदही करून घेतली आहे. प्लॉटधारकांनी समितीच्या उपरोक्ष मालमत्ता पत्रकात वारस नोंद, हक्कसोड, नावात बदल करुन घेतले आहेत. यासह ३२ मुद्द्यांची तक्रार सहकारमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

‘अविश्‍वासा’ने जमेना म्हणून सत्तेचा गैरवापर

या पदावर राहण्याची माझी इच्छा नाही, व्यापारी आणि संचालकांनी आग्रह केल्याने मी पदावर आहे. ‘अविश्‍वासा’च्या माध्यामातून मला या पदावरुन दूर करता येत नसल्याने काही मंडळींनी राज्यातील सत्तेच्या मार्गातून सोलापूर बाजार समितीवर प्रशासक आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तक्रारीतील अनेक मुद्दे हे आमचे संचालक मंडळ येण्यापूर्वीचे आहेत. बाजार समितीत आम्ही करताना प्रत्येकवेळी पणन विभागाची व सहकार विभागाची मान्यता घेतली आहे. त्यांच्या मान्यतेनंतर व अभिप्रायानंतर आम्ही बाजार समितीचे कामकाज केले आहे. राजकीय सुडातून ही कारवाई होत असल्याचा आरोप बाजार समितीचे सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला आहे.

balasaheb patil
सोलापूर : संपकाळात राज्यात 35 एसटीच्या गाड्यांची बांधणी

माझ्यासह तिघांच्या नियुक्तीचा आदेश मिळाला आहे. आम्ही मदतीसाठी आमच्या कार्यालयातील पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शुक्रवारी (ता.३१) बाजार समितीत जाऊन आम्ही बाजार समितीकडे तत्काळ दप्तर देण्याची मागणी केली आहे. दप्तर उपलब्ध झाल्यानंतर तक्रारीच्या मुद्यांवर चौकशी करण्यात येईल आणि याबाबतचा अहवाल जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांना सादर केला जाईल.

- विष्णू डोके,

तपासणी पथक प्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Young Woman Taken to Lodge and Allegedly Assaulted Man Booked After Blackmailing Her for Gold Chain and Money
Marathi News Esakal
www.esakal.com