'त्या आरोपीच्या अटकेस विलंब करणाऱ्या पोलिस निरीक्षकाला करा निलंबित' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Movement on behalf of Janhit Shetkari Sanghatana at Marwade

मरवडे येथील भक्ती व पूनम चव्हाण या दोन लहान बहिणीचा बासुंदी श्रीखंड पनीर आणि रबडी या दुग्धजन्य पदार्थांतून झालेल्या विषबाधेमुळे दहा दिवसापूर्वी मृत्यू झाला.

'त्या आरोपीच्या अटकेस विलंब करणाऱ्या पोलिस निरीक्षकाला करा निलंबित'

मंगळवेढा (सोलापूर) : दुग्धजन्य पदार्थामुळे (Dairy products) मृत्यमुखी पडलेल्या मरवडे येथील दोन चिमुकल्याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या आरोपीला अटक करण्यासाठी पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांची खातेनिहाय चौकशी करून निलंबित (Suspended) करण्यात यावे, अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैया देशमुख यांनी केली

हेही वाचा: मंगळवेढा उपसा सिंचन योजना रखडली

मरवडे (Marwade) येथील भक्ती व पूनम चव्हाण या दोन लहान बहिणीचा बासुंदी, श्रीखंड पनीर आणि रबडी या दुग्धजन्य पदार्थांतून झालेल्या विषबाधेमुळे दहा दिवसापूर्वी मृत्यू झाला. या प्रकरणात अन्नभेसळ खात्याने सतीश कौडूभैरी व आकाश फुगारे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु अद्याप या आरोपीला अटक केली नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवराज घुले, लतीफ तांबोळी, सुरेश पवार, दत्तात्रय गणपाटील, नामदेव गायकवाड, सरपंच नितीन घुले, रजाक मुजावर, दादासाहेब पवार, अजित पवार, दत्तात्रय गणपाटील, धन्यकुमार पाटील, शिवाजी पवार, माणिक पवार, दत्ता मासाळ, राजाराम पोतदार, संभाजी रोंगे, राजाराम कालीबाग, प्रकाश सूर्यवंशी, हैदर केंगार, शिवाजी केंगार, संतोष पवार, आदी उपस्थित होते.

हेही वाचा: मंगळवेढा नगरपालिकेसाठी आवताडेंची स्वतंत्र मोर्चेबांधणी

यावेळी बोलताना प्रभाकर देशमुख यांनी लोकप्रतिनिधी हे आकाशातून पडलेले नसतात त्यांना जनतेने निवडून दिलेले असते. मंगळवेढ्याचा लोकप्रतिनिधीने एवढी मोठी घटना घडून देखील विधानसभेत याबाबत ब्र शब्द देखील आवाज उठवला नसल्याबाबत नाराजी व्यक्त करीत तालुक्यातील भेसळीच्या प्रकरणात अर्थपूर्ण व्यवहारामुळे कारवाई होत नसल्याचे सांगून माचनुर च्या प्रतीक शिवशिरण हत्या प्रकरणात वेगळ्या मार्गाने आंदोलन केल्यामुळे या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली, परंतु तालुक्यातील लोकप्रतिनिधी व इतर घटक हे एवढा मोठी घटना घडून देखील या प्रकरणांमध्ये दुर्लक्ष कसे करतात यावर खंत व्यक्त केली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करू, असे आश्‍वासन दिल्यामुळे उपस्थित जमावाचा संताप शांत झाला. रास्ता रोको आंदोलन यामुळे मंगळवेढा व विजापूर या महामार्गावरील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती. आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.

आ.समाधान आवताडे यांनी तालुक्यातील अवैध व्यवसायाला उपविभागीय पोलिस अधिकारी व त्यांचे कर्मचाऱ्याला जबाबदार धरून विधिमंडळात आवाज उठवला होता. परंतु आजच्या रस्ता रोको आंदोलनात याच उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या तपास कार्याबद्दल तालुक्यातील गुन्हेगारी नियंत्रणाबद्दल कौतुक करण्यात आले

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top