
Ajit Pawar under pressure, forced to break protocol – MP Dhairyasheel Mohite-Patil
सोलापूर: माढा तालुक्यातील कुर्डू येथील मुरूम उपशाप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परीविक्षाधिन उपविभागीय पोलिस अधिकारी अंजली कृष्णा यांना धमकावल्याच्या व्हिडिआने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणी खुद्द अजितदादांनी खुलासाही केलेला आहे. याप्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी खुलासा केला आहे. ‘एका मध्यस्थी व्यक्तीच्या दबावापोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रोटोकॉल सोडून बोलण्याची वेळ आली,’ असे मोहिते पाटील यांनी म्हटले आहे.