
MP Dhairyasheel Mohite-Patil: Centre positive on Ujani pollution; MVA united for upcoming elections.
करकंब : उजनी धरणातील प्रदूषित पाण्यामुळे भीमा नदीकाठच्या लोकांचे, जनावरांचे आणि जमिनीचेही आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत आपण केंद्र शासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. केंद्रानेही महाराष्ट्र शासनाला अवगत केले असून, उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, याबाबत शासनच उदासीन असल्याचे मत माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.