
"MP Mohite-Patil warns government during Garwad Pati protest for Neera Deoghar water supply."
Sakal
माळशिरस/पिलीव: माळशिरस तालुक्यातील २२ गावांच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी नीरा देवघरचे पाणी मिळणे गरजेचे आहे. आम्ही संबंधित विभागाला काम सुरू करण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी देत आहोत. काम सुरू झाले नाही तर मंत्रालयात घुसून आंदोलन करावे लागले तरी मागे हटणार नाही. सरकार बहिरे झाले आहे. त्याच्या कानावर शेतकऱ्यांची हाक जात नाही. या सरकारला जाग आणण्यासाठी आमचा लढा सुरू असल्याची आक्रमक भूमिका माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.