
सोलापूर: कथित मतदान चोरीच्या मुद्यावर शहर व जिल्हा काँग्रेसने खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या स्वातंत्र्यदिनी सायंकाळी मशाल रॅली काढली. यावेळी खासदार प्रणिती यांनी जेएनयूफेम कन्हैय्याकुमार याच्या स्टाईलने घोषणा देत सोलापूरकरांचे लक्ष वेधले. यावेळी वोट चोरोंसे आझादी, हुकूमशहासे आझादी अशा घोषणा दिल्या.