esakal | शरद पवारांची 'डॉक्‍टरेट' राज्यपालांच्या हाती! सोलापूर विद्यापीठाचा प्रस्ताव
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar.

राज्यपालांच्या मंजुरीनंतर खासदार शरद पवार यांना विद्यापीठाकडून डॉक्‍टरेट पदवी प्रदान केली जाईल, असा विश्‍वासही त्यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केला.

शरद पवारांची 'डॉक्‍टरेट' राज्यपालांच्या हाती

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद पवार यांच्या सामाजिक, शैक्षणिक, कृषी, क्रिडा व राजकीय क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने डॉक्‍टरेट (डी-लिट) पदवी द्यावी, असा प्रस्ताव छत्रपती शिवाजी नाईट कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा सिनेट सदस्य प्रा. सचिन गायकवाड यांनी मार्च 2021 मध्ये झालेल्या अधिसभेत मांडला होता. तो प्रस्ताव आता विद्यापीठाने अंतिम मंजुरीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे पाठविला आहे.

हेही वाचा: साधना बँकेकडून 'श्री शरद पवार गुणवंत कन्यारत्न' पुरस्काराची घोषणा

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची (अधिसभा) सभा पार पडली. यावेळी कोरोना काळात झालेल्या ऑनलाइन परीक्षांमधील प्रश्‍नपत्रिकेच्या दरावरून वादविवाद झाले. दरम्यान, प्रा. गायकवाड यांनी खासदार शरद पवार यांना डी-लिट देण्याच्या ठरावावर काय कार्यवाही झाली, अशी विचारणा केली. त्यावेळी तो प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविल्याचे उत्तर कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिले. त्यावेळी गायकवाड यांनी कुलगुरुंचे अभिनंदन केले. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या खेळाडूंना विद्यापीठाकडून रोखीने पारितोषिक देऊन सन्मानित केले जाते. त्यांच्यासोबत प्रशिक्षक व संघ व्यवस्थापकांनाही बक्षिस द्यावे, असा प्रस्ताव प्रा. सचिन गायकवाड यांनी मांडला. दरम्यान, राज्यपालांच्या मंजुरीनंतर खासदार शरद पवार यांना विद्यापीठाकडून डॉक्‍टरेट पदवी प्रदान केली जाईल, असा विश्‍वासही त्यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केला.

हेही वाचा: कोरोना कालखंडातही रयत शिक्षण संस्थेची भूमिका महत्त्वाची: शरद पवार

ग्लोबल टिचर डिसले यांनाही द्या डॉक्‍टरेट

ग्लोबल टिचर म्हणून नावलौकिक मिळविणाऱ्या रणजितसिंह डिसले यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने डॉक्‍टरेट पदवी द्यावी, असा प्रस्ताव मंगळवेढ्याचे प्रा. राजेंद्र गायकवाड यांनी मांडला. प्रा. सचिन गायकवाड यांनी त्याला अनुमोदन दिले. परंतु, तो प्रस्ताव विद्यापीठ कायद्यातील परिनियमानुसार अधिसभेतून न घेता स्वतंत्रपणे सादर करावा, असे कुलगुरुंनी स्पष्ट केले. त्यामुळे तो प्रस्ताव अधिसभेतून मागे घेण्यात आला. परंतु, तो आता परिनियमानुसार थेट कुलगुरुंकडे सादर केला जाणार आहे. त्यामध्ये डिसले यांना कोणत्या योगदानासाठी डॉक्‍टरेट द्यावी, त्यातून विद्यापीठाला तथा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना काय लाभ मिळेल, यादृष्टीने तो प्रस्ताव असणार आहे. त्यानंतर त्यावर अभ्यास करून कुलगुरुंकडून पुढील कार्यवाही होईल, असे गायकवाड यांनी सांगितले.

loading image
go to top