कोरोना कालखंडातही रयत शिक्षण संस्थेची भूमिका महत्त्वाची: शरद पवार

Sharad Pawar
Sharad Pawaresakal

सातारा: कोविड-19 सारख्या विषाणूमुळे संपूर्ण जगावर एक मोठे संकट आले आहे. अशा कालखंडात रयत शिक्षण संस्थेने ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी गेली दोन वर्ष ऑनलाइन अध्यापनासाठी संस्थेतील सर्व अधिकारी आणि शिक्षकांनी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाचे आहे. या काळात ऑनलाइन विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही ही गोष्ट रयत शिक्षण संस्थेच्या शंभर वर्षाच्या लौकिकाला साजेशी अशा प्रकारचे आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा. शरदराव पवार यांनी केले.

Sharad Pawar
सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणीस थंड प्रतिसाद

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेले आहे. ऑनलाईन कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून म्हणून बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील हे होते.

Sharad Pawar
सातारा : पोलिसांत निनावी अर्जांमुळे अधिकारी, कर्मचारी त्रस्त

रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी ऑनलाइन अध्यापनाच्या बाबतीत केलेल्या कार्याचे कौतुक करून ते पुढे म्हणाले, कोविड १९ सारख्या विषाणूमुळे जगामध्ये सर्वच क्षेत्रात एक प्रकारची नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. अशा कालखंडात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप, अँड्रॉइड मोबाइल यासारखी साधनांची कमतरता असताना सुद्धा रोझ सारखा प्रकल्प राबवून शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श संस्थेने निर्माण केला आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून संस्थेने दररोज अडीच लाख विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचून त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब कौतुकास्पद अशी आहे.

Sharad Pawar
सातारा: मिनी काश्मीर कास पठारावर पर्यटकांचा बहर

आज संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 70 टक्के विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण ऑनलाइनच्या माध्यमातून आपण पोहोचू शकलो ही समाधानाची बाब आहेच. तथापि केवळ आर्थिक परिस्थिती नाही म्हणून डोंगर दऱ्यात आणि आदिवासी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या अभावामुळे अँड्रॉइड फोनचा अभावामुळे सुमारे तीस टक्के विद्यार्थी या शिक्षणापासून दूर राहिले याचीही खंत आहेच. ही तफावत दूर करण्यासाठी भविष्यामध्ये आपल्याला अत्यंत जोमाने काम करावे लागेल. रयत शिक्षण संस्था ही जबाबदारी पार पाडेल याची मला खात्री आहे.

Sharad Pawar
सातारा : झाडांच्या फांद्या तोडल्याबद्दल वीज कंपनीला नोटीस

ऑनलाइन शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात सुद्धा संस्थेने पार पडलेली जबाबदारी कौतुकास्पद अशीच आहे. या क्षेत्रात संस्थेला मिळालेले यश तेवढेच दिलासा देणारे आहे. आज महाराष्ट्राच्या प्रशासकीय क्षेत्रात सुमारे अकराशे विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर काम करीत आहेत. ही अत्यंत समाधानाची आणि नवीन कार्य करणाऱ्यासाठी आपणा सर्वांना ऊर्जा देणारी आहे, असे मत मा. खा. शरदरावजी पवार यांनी व्यक्त केले. कर्मवीर जयंतीच्या ऑनलाइन कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेच्यावतीने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार आणि रयत माउली सौ लक्ष्मीबाई पाटील राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात.

Sharad Pawar
सातारा जिल्ह्याला मिळाले 1 लाख 82 हजार डोस

विशेषतः समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक उन्नतीसाठी ज्यांनी असामान्य कार्य केले आहे, अशा व्यक्तींना हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. सन 2020 चे पुरस्कार मा.शरदरावजी पवार यांनी जाहीर केले. यामध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार स्व. गणपतराव देशमुख यांना जाहीर करण्यात आला. दोन लाख पन्नास हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर रयत माउली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यामध्ये अत्यंत उल्लेखनीय अशा स्वरूपाचे सामाजिक कार्य करणार्‍या बीजमाता सौ राहिबाई सोमा पोपरे यांना जाहीर करण्यात आला. 250000 रुपये रोख मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Sharad Pawar
सातारा परिसरात गव्‍याचा वावर; वनविभागाकडून शोध मोहीम सुरु

रयत शिक्षण संस्थेच्या वतीने ऑनलाइन स्वरूपात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे, संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे इतर सर्व मान्यवर सदस्य, जनरल बॉडी सदस्य, लाईफ मेंबर, लाईफ वर्कर कार्यकर्ते, रयत सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज सकाळी कर्मवीर समाधी ला संस्थेचे उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिव मा. प्राचार्य डॉ. प्रतिभा गायकवाड, माध्यमिक विभागाचे सहसचिव मा.संजय नागपुरे संस्थेचे ऑडिटर डॉ. शिवलिंग मेनकुदळे, मध्य विभागाचे विभागीय अधिकारी मा. राजेंद्र साळुंखे संस्थेचे कायदा सल्लागार मा. ॲड. दिलावरसाहेब मुल्ला व संस्थेचे समन्वयक डी एस सूर्यवंशी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कर्मवीर समाधीस अभिवादन करण्यात आले.

Sharad Pawar
सातारा: मंदिराचे छत कोसळून एक ठार, तर तिघे गंभीर जखमी

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी केले तर सर्व उपस्थितांच्या बद्दलची कृतज्ञता संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिव मा प्राचार्य डॉ. प्रतिभा गायकवाड यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com