
सोलापूर : पोलिस खात्यातील पत्नी आणि महावितरण कार्यालयातील लिपिक तरुणाच्या संसारात कौटुंबिक कारणातून दुरावा निर्माण झाला होता. वारंवार विनवणी करूनही पत्नी नांदायला येत नव्हती. त्यामुळे त्या तरुणाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे धाव घेत मदतीची मागणी केली. प्राधिकरणाच्या मदतीने त्यांच्यातील पाच वर्षांचा दुरावा कमी होऊन संसार पुन्हा जुळला आहे. तो तरुण अक्कलकोट तालुक्यातील आहे.