नागरिकांनो, पावसाळ्यातील विजांच्या दुर्घटना टाळा ! "ही' घ्या दक्षता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Short Circuit

वारे, वादळ वा पावसात विजेचे खांब, तारा तुटणे, शॉर्टसर्किटमुळे काही दुर्दैवी अपघात घडू शकतात. हे टाळण्यासाठी शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी.

पावसाळ्यातील विजांच्या दुर्घटना टाळा ! "ही' घ्या दक्षता

sakal_logo
By
विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी (सोलापूर) : वारे, वादळ वा पावसात विजेचे खांब, तारा तुटणे, शॉर्टसर्किटमुळे काही दुर्दैवी अपघात घडू शकतात. (Short circuits can cause some unfortunate accidents) हे टाळण्यासाठी शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणच्या (MSEDCL) अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: वाढतोय म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव ! अशी घ्या दक्षता

पावसाळ्यात वादळी वारे, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटून लोंबकळत असतात. शेती पंपाचे स्वीच बॉक्‍स तुटतात. विजेचे खांब वाकतात किंवा पडतात. झाडाच्या फांद्या तारांवर पडल्याने तारा तुटून खाली पडतात. यातून वीज प्रवाह वाहत असेल तर अपघात घडू शकतो. विशेषतः ग्रामीण भागात नागरिकांनी याबाबत काळजी घेणे आवश्‍यक आहे. शहरात सुद्धा नागरिकांनी घरातील आर्थिंग, तारांचे आवरण चांगल्या प्रकारची व सुस्थितीत असल्याची खात्री करावी.

हेही वाचा: लष्करी अळीचा धोका वेळीच ओळखा! मकेवरील अळीचे असे करा व्यवस्थापन

अशी घ्या काळजी

  • विजेच्या तारांखाली किंवा खांबांजवळ झाडे लावू नका

  • तारांमध्ये झाडांच्या फांद्या गेल्या असतील तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सांगून छाटून घ्या

  • विजेच्या खांबाला टेकून दुचाकी, सायकल लावू नका

  • विजेचा दाब कमी असेल तर बायपास करू नका

  • अधिकृत वीज जोडणीच करा

  • विजेच्या तारा तुटल्या की लगेच महावितरणशी संपर्क करा

  • विजेच्या खांबाला जनावरे बांधू नका

वाऱ्यामुळे अथवा पावसामुळे विजेच्या तारा तुटून लोंबकळत असतील तर तत्काळ महावितरणला कळवावे. वीज पुरवठा खंडित झाल्याचे समजताच महावितरणचे कर्मचारी पावसात, वाऱ्यात दुरुस्तीचे काम सुरू करतात. त्यातही काही वेळा तांत्रिक अडचणी असतात. वीजपुरवठा सुरळीत होण्याची थोडा वेळ वाट पाहा. लगेच वारंवार फोन करण्याचे टाळा.

- उल्हास कानगुडे, प्रभारी उपकार्यकारी अभियंता, महावितरण, कुर्डुवाडी

loading image
go to top