शहरात वाढतोय म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव ! अशी घ्या दक्षता अन्‌ काळजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mucormycosis

कोविडनंतर होणारा गुंतागुंतीचा म्युकरमायकोसिस आजार सोलापुरात पाय पसरू लागला आहे.

वाढतोय म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव ! अशी घ्या दक्षता

sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर : शहरातील बहुतांश मोठ्या रुग्णालयांत म्युकरमायकोसिस (Mucormycosis) या बुरशीजन्य आजाराच्या (fungal diseases) रुग्णांची संख्या दोन अंकींपर्यंत वाढली आहे. कोविडनंतर (Covid-19) होणारा गुंतागुंतीचा आजार सोलापुरात पाय पसरू लागला आहे. या आजारावर लागणाऱ्या ऍम्पोटेरिसीन या इंजेक्‍शनचा (Amphotericin injection) तुटवडा निर्माण झाला आहे. (The growing number of Mucormycosis patients in the city of Solapur has raised concerns)

हेही वाचा: "उजनी'तून सोडले सोलापूरसाठी पाणी ! 3600 क्‍युसेक विसर्ग

काय आहे म्युकरमायकोसिस?

सर्वसाधारणपणे म्युकरमायकोसिस हा आजार ब्लॅक फंगस नावाने ओळखला जातो. हा बुरशीजन्य आजार आहे. या आजाराचा संसर्ग काही विशिष्ट कारणामुळे होतो. कोविड आजाराच्या रुग्णांना विशेषतः ज्यांची रक्तशर्करा नियंत्रणाबाहेर आहे, या रुग्णांना त्याचा संसर्ग अधिक प्रमाणात होत आहे. सर्वसाधारणपणे रुग्णांना ऑक्‍सिजन उपकरणाच्या माध्यमातून हा संसर्ग होतो. तसेच मधुमेहाच्या रुग्णांना देखील हा आजार होत आहे. कोरोना उपचारात स्टिरॉईडयुक्त औषधाचा अधिक उपयोग झाल्यास या आजाराचे ते अप्रत्यक्ष कारण बनते. कोरोनात कमी झालेली प्रतिकारक्षमता व शरीरात वाढलेली रक्तशर्करा हे या संसर्गाचे प्रमुख कारण आहे.

हेही वाचा: ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाचा वाढला धोका ! निखळताहेत कमानीचे दगड

कोरोनापेक्षा अधिक धोकादायक

या ब्लॅक फंगसच्या संसर्गाचा मृत्यूदर जवळपास पन्नास टक्के एवढा आहे. कोरोनाच्या तुलनेत हा मृत्यूदर अधिक आहे. योग्यवेळेत उपचार मिळाले नाही तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो. मात्र या आजारावर महत्त्वाचे इंजेक्‍शन म्हणून ऍम्पोटेरिसीन हे वापरले जाते. सलग 21 दिवस हे इंजेक्‍शन रुग्णाला दिले जाते. तसेच ओरल हायजिन, वैयक्तिक स्वच्छता, प्रतिकारक्षमता आदी अनेक मुद्दे या आजारात महत्त्वाचे ठरतात.

रुग्णांची वाढती संख्या व इंजेक्‍शनचा तुटवडा

सध्या शहरातील सर्वच मोठ्या रुग्णालयांमध्ये ब्लॅक फंगस आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. प्रत्येक मोठ्या रुग्णालयात हा आकडा 10 ते 15 असा आहे. मात्र वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमध्ये प्रतिकार क्षमता कमी झालेले रुग्ण या आजाराला बळी पडत आहेत. सर्वच रुग्णालयात हे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यासोबत या आजारासाठी लागणाऱ्या ऍम्पोटेरीसीन या इंजेक्‍शनची मागणी वाढली. पण प्रत्यक्षात औषधी दुकानात त्याचा तुटवडा भासत आहे.

ठळक बाबी

  • प्रत्येक रुग्णालयात 10 ते 15 रुग्ण

  • प्रतिकारक्षमता कमी झालेल्या कोरोना रुग्णांवर ब्लॅक फंगसचा हल्ला

  • शरीरात वाढलेली रक्तशर्करा हे एक कारण

  • ऍम्पोटेरीसीन इंजेक्‍शन ठरते रामबाण औषध

  • मुखाची स्वच्छता व प्रतिकारक्षमता वर्धन करणे आवश्‍यक

नागरिकांनी काय करावे?

  • मधुमेहींनी त्यांची रक्तशर्करा नियंत्रणात ठेवावी

  • स्वच्छ धुतलेले मास्क वापरावेत

  • प्रतिकारक्षमता चांगली ठेवावी

सध्या म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण वाढत चालले आहेत. या आजारात मृत्यूदर जास्त असला तरी ऍम्पोटेरीसीन हे इंजेक्‍शन प्रभावी ठरते. सध्या मार्कंडेय रुग्णालयात या आजाराच्या रुग्णांची संख्या 10 ते 15 एवढी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

- डॉ. अमोल आचलेरकर, छातीरोग तज्ज्ञ, श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय

loading image
go to top