मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा 'डीपीआर' एप्रिलपर्यंत!

रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाकडून ही मंजुरी घ्यावी लागणार आहे.
 bullet train
bullet trainesakal
Summary

रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाकडून ही मंजुरी घ्यावी लागणार आहे.

सोलापूर : मुंबई-हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेन कॉरिडॉर प्रकल्प (Mumbai-Hyderabad High Speed ​​Bullet Train Corridor Project) साकार होण्याच्या दिशेने वेगाने पावले पडत आहेत. त्या अनुषंगाने हवाई सह सर्व प्रकारचे आवश्‍यक सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. आता या सर्वेक्षणातून प्राप्त झालेल्या आकडेवारीचे विश्‍लेषण करून प्रकल्प अहवाल अर्थात "डीपीआर' 'DPR' तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम पार पाडून (ता. 15) एप्रिलपर्यंत रेल्वे मंत्रालयाकडे डीपीआर पाठविला जाण्याची शक्‍यता आहे. रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाकडून ही मंजुरी घ्यावी लागणार आहे. मंजुरी प्राप्त होताच मुंबई- अहमदाबाद हायस्पीड बुलेट रेल कॉरिडॉरच्या धर्तीवर मुंबई-हैदराबाद हायस्पीड बुलेट रेल कॉरिडॉर प्रकल्पाचे जमीनीवरील काम सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 bullet train
सोलापूर महापालिकेने मुदत संपलेल्या ९५ जागांचा घेतला ताबा

हे करण्यात आले सर्व्हे

- एरिअल अर्थात लीडर सर्व्हे

- रायडशिप सर्व्हे

- एन्व्हायरमेंटल इम्पॅक्‍ट सर्व्हे

- सोशल इम्पॅक्‍ट सर्व्हे

- डीजीपीएस सर्व्हे

मुंबई-हैदराबाद हायस्पीड बुलेट रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प 670 किलोमीटर क्षेत्रावर प्रस्तावित आहे. या क्षेत्रात ठाणे, नवी मुंबई, कामशेत, पुणे, बारामती, अकलूज (प्रस्तावित), पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, तांडूर, विकाराबाद, हैदराबाद थांबे असणार आहेत. या कॉरिडॉरमध्ये ताशी 350 किमी प्रति तास वेगाने बुलेट ट्रेन धावेल. बुलेट ट्रेनमध्ये एका वेळी 750 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.

 bullet train
सोलापूर : तरुणाने बनवली बॅटरीवर चालणारी सायकल

मुंबई-हैदराबाद हायस्पीड बुलेट रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पासाठी सर्व प्रकारच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सर्वेक्षणातून प्राप्त अहवालाचे विश्‍लेषण केले जाऊन डीपीआर तयार केला जात आहे. लवकरच हे काम पूर्ण होऊन एप्रिल अखेरपर्यंत डीपीआर रेल्वे बोर्डाकडे पाठविण्याची शक्‍यता आहे.

- सुषमा गौर, जनसंपर्क अधिकारी, नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नवी दिल्ली

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन

- लांबी 508 किमी

- सद्यस्थिती-महाराष्ट्रात भूसंपादन सुरू, गुजरातमध्ये संपादन पूर्ण

- स्थानके - ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती.

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन

- लांबी-636 किमी

- सद्यस्थिती-डीपीआर बनविण्याचे काम सुरू

- मार्गातील शहरे-शहापूर, इगतपुरी, शिर्डी, औरंगाबाद, जालना, मालेगाव, करंजाड, पुलगाव, वर्धा, खापरी डेपो आणि नागपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com