‘ओपन’ जेऊ देईना अन् ‘क्लोज’ झोपू देईना !

सट्टा बाजाराच्या मोहात अडकलेले मटका बहाद्दर मात्र ‘कोमात’
mumbai kalyan Matka gambling market crime police action social media post viral
mumbai kalyan Matka gambling market crime police action social media post viralSakal
Summary

खाकी अन् खादी वर्दीवाल्यांची पाचही बोटे तुपात

- रवी ढोबळे

सोलापूर : मुंबई आणि कल्याण मटक्याच्या सट्टेबाजाराच्या दलदलीत सापडलेल्या सोलापुरातील अनेकांची स्थिती ‘ओपन’ जेऊ देईना अन् ‘क्लोज’ झोपू देईना अशी झाली आहे. मुंबईचा सट्टा बाजार ‘ओपन’ सकाळी ९.३० वाजता तर ‘क्लोज’ दुपारी १२.०५ वाजता काढला जातोय. शिवाय कल्याणचा सट्टा बाजार ‘ओपन’ दुपारी ४.३० वाजता ‘क्लोज’ ५.४५ वाजता निघतोय.

दरम्यान, मुंबई, कल्याण सट्टा बाजाराच्या नादात मटका खेळणाऱ्यांची ही गत झाली आहे. सट्टा बाजार तेजीत चालत असल्याने खाकी आणि खादी वर्दीवाल्यांची पाचही बोटे तुपात राहात आहेत, तर मटक्याच्या सट्टा बाजाराच्या मोहात अडकलेले मटका बहाद्दर मात्र ‘कोमात’ असल्याचे वास्तव आहे.

कधी तरी एखाद्यावेळी आकडा लागला असला तरी ‘हमारा एक दिन आएगा’ अशा भोळ्या भाबड्या आशेवर मटका खेळणारे उद्ध्वस्त होताहेत. त्यांची हीच भोळी-भाबडी अशा त्यांना मटक्याच्या दलदलीमधून बाहेर पडू देईना.

पोलिस आयुक्तांबद्दलची ‘ती’ पोस्ट प्रचंड व्हायरल

‘सकाळ’मधील मटक्यासंबंधीच्या वस्तुनिष्ठ वृत्तांकनादरम्यान रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष कोमल साळुंके-ढोबळे यांनी सोलापूरातील अवैध मटक्यासंदर्भात पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांचे छायाचित्र वापरून एक पोस्ट सामाजिक माध्यमांवर व्हायरल केली आहे.

या पोस्टमध्ये साळुंके-ढोबळे म्हणतात, तुमची निवृत्ती जवळ आली म्हणून जीवनातून लोकांना निवृत्त करू नका. माय बहिणींची कपाळं पांढरी करणारी व्यवस्था बंद करण्याऐवजी, अशा उद्योगांना खत पाणी घालणारे उद्योग का वाढतायेत याचे चिंतन करा.

एवढे प्रशासन पोकळ का झाले? कोणाच्या मदतीने आणि कोणाचे ऐकून या पद्धतीने अवैध धंद्याला प्रोत्साहन देताय? माय माऊलींचा आणि लेक बाळीचा आशीर्वाद घेण्यासाठी काम करा. समाज उद्ध्वस्त होतोय याचं भान ठेवा. तुमची निवृत्ती जवळ आली म्हणून जीवनातून लोकांना निवृत्त करू नका. तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष करायचं असेल तर सक्षम अधिकाऱ्यांना चार्ज देऊन मोकळे व्हा.

कारवाईच्या भीतीने टपऱ्यांना टाळे; ‘ओपन’बाजारात सन्नाटा

‘सकाळ’मधून मटक्याच्या संदर्भात सुरु असलेले वृत्तांकन आणि बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा कोमल साळुंके-ढोबळे यांनी शहरात राजरोसपणे चालणारे अवैध धंदे यासंदर्भात उठवलेला आवाज, पोलिस आयुक्तांना दिलेला इशारा, गृहमंत्र्यांकडे जाण्याचा पाठपुरावा करण्याचे केलेले भाष्य या पार्श्वभूमीवर, कारवाईच्या भीतीने सोलापूर शहर परिसरातील काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीमधील मटका बुकींच्या टपऱ्यांना गुरुवारी रात्रीपासून टाळे लागले.

आज शुक्रवारी मरिआई चौक, दमाणी नगर, भैया चौक, रेल्वे स्टेशन परिसर, सात रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक, निराळे वस्ती, सिद्धेश्वर मंदिरासमोरील परिसरा, एसटी बस स्थानक, गुरूनानक चौक, कुमठा नाका आदी ठिकाणी मटका बुकी चालत असलेल्या टपऱ्या बंद ठेवण्यात आल्याचे चित्र होते. खुलेआमपणे मटका घेण्याऐवजी टपऱ्या बंद ठेऊन मोबाईल आकडे पाठविण्याची शक्कल बुकीवाल्यांनी शुक्रवारी लढविली.

मटक्याच्या विरोधात ‘सकाळ’ने सुरु ठेवलेले वृत्तांकन वस्तुनिष्ठ आहे. मटका जुगारावर जुजबी कारवाई व्हायला नको. मटका सोलापुरातून कायमचा हद्दपार व्हायलाच हवा. मात्र, पोलिस कारवाईचा नुसता फार्स दाखवतात. तथापि, कायद्याच्या आधारे मटका किंगांच्या हातात बेड्या ठोकून त्यांची वरात काढण्याबरोबरच त्यांना जेलची हवा खाऊ द्यायला हवी.

तरच मटका किंगांच्या समाजविघातक प्रवृत्तींना जरब बसेल. सोलापुरात मटक्याचा एवढा सुळसुळाट असताना पोलिस का मूग गिळून गप्प आहेत? सोलापूरचे एवढे वाटोळे होत असताना पोलिस असली कशी शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडताहेत?

- दास शेळके, समन्वयक, मराठा महासंघ, सोलापूर

सोलापूर शहरात मटक्याची उलाढाल दररोजची पाहिली तर ती काही कोटींची आहे. मटक्यावर आकडे लावणारे हे समाजामधील सर्व घटकांमधील लोक आहेत. सोलापुरात मटक्याच्या बुकी या राजरोसपणे रस्त्यावरच्या टपऱ्यांमध्ये चालतात. त्या सर्वसामान्य माणसाला दिसतात. पण पोलिसांना दिसत नाहीत, याचे सर्वसामान्य नागरिकांना कायमच कुतूहल राहिलेले आहे.

मटक्याच्या जुगार कारवाई नव्हे तर तोपूर्णपणे बंदच व्हायला हवा. कारवाईपेक्षा तो हद्दपार करण्याची मानसिकता पोलिसांनी करावी. मटका,जुगार हा जरी कायद्याच्या विषय असला तरी तितकाच तो सामाजिक विषय सुद्धा आहे. सामाजिक पुढाऱ्यांनी आपापल्या समाजातील लोकांना मटका जुगार यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करावा.

- योगिन गुर्जर, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com