शहरातील निर्बंध उठवण्याचा महापालिका आयुक्‍तांचा प्रस्ताव

शहरातील निर्बंध उठवण्याचा महापालिका आयुक्‍तांचा प्रस्ताव
शहरातील निर्बंध उठवण्याचा महापालिका आयुक्‍तांचा प्रस्ताव
शहरातील निर्बंध उठवण्याचा महापालिका आयुक्‍तांचा प्रस्तावCanva
Summary

शहराची लोकसंख्या साडेबारा लाखांहून अधिक असून शहरातील कोरोनाचा संसर्गही आटोक्‍यात आहे.

सोलापूर : शहराची लोकसंख्या साडेबारा लाखांहून अधिक असून शहरातील कोरोनाचा (Covid-19) संसर्गही आटोक्‍यात आहे. निर्बंधांमुळे व्यापारी, व्यावसायिकांसह कोचिंग क्‍लासेस, शाळांमधील विद्यार्थी, हातावरील पोट असलेल्यांसमोरील अडचणी वाढल्याने शहरातील निर्बंध शिथिल करावेत, असा प्रस्ताव महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर (Solapur Municipal Commissioner P. Shivshankar) यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांना पाठविला आहे. (Municipal Commissioner's proposal to reduce corona restrictions in the city-ssd73)

शहरातील निर्बंध उठवण्याचा महापालिका आयुक्‍तांचा प्रस्ताव
'एमपीएससी'तर्फे मेगाभरती ! आयोगाच्या सदस्यांची नावे अंतिम

संपूर्ण जुलै महिन्यात (31 दिवसांत) सोलापूर शहरातील 34 हजार 366 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 369 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून, त्यातील बहुतेक रुग्णांमध्ये तीव्र व अतितीव्र लक्षणे आढळली नाहीत. बहुतांश रुग्ण कोरोनामुक्‍त झाले असून सध्या 95 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जुलैमध्ये शहरातील 23 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृत्यूदरही कमी झाला आहे. रुग्णवाढीचा पॉझिटिव्हिटी रेट 1.7 टक्‍क्‍यांपर्यंत असून जवळपास 94 टक्के ऑक्‍सिजन बेड रिकाम्या आहेत. दुसरीकडे शहरातील अडीच लाख व्यक्‍तींचे लसीकरण झाले असून त्यापैकी 80 हजारांहून अधिक व्यक्‍तींनी दुसरा डोसदेखील घेतला आहे. विडी घरकुल, जुळे सोलापूरसह अन्य परिसरातील नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण केले जात आहे. गर्भवती मातांचेही लसीकरण सुरू आहे. त्यामुळे शहरातील निर्बंध शिथिल करण्यास हरकत नाही, असेही त्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. महापालिका आयुक्‍तांनी 29 जुलैला तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे पाठविला आहे. परंतु, त्यांनी अद्याप तो प्रस्ताव शासनाकडे पाठविला नसल्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे निर्बंध उठविण्यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी शहरातील व्यापाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन महापालिकेसमोर आंदोलने केली होती. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यातून जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव मान्य करण्यात आला होता. मात्र, डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले असून आता निर्बंध शिथिलतेची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कधीपर्यंत शासनाला प्रस्ताव पाठविणार, शासनाकडून त्याला मंजुरी मिळेल का, पालकमंत्री त्यासाठी पाठपुरावा करतील का, असे विविध प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

शहरातील निर्बंध उठवण्याचा महापालिका आयुक्‍तांचा प्रस्ताव
'एमआयएममध्ये येण्यास अनेकजण इच्छुक! उत्तर-दक्षिणमध्येही लक्ष'

लहान मुले आजारी पडण्याचे वाढतेय प्रमाण

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची चिंता आता सतावू लागली आहे. ग्रामीणमध्ये लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. शहरातदेखील लहान मुलांमधील आजार बळावत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. तत्पूर्वी, केंद्र सरकारने महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा दिला असून त्यात सोलापूरचा समावेश आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अजूनही अपेक्षेप्रमाणे कमी झाली नसून बहुतेक लोक विविध कारणांसाठी शहरात ये-जा करतात. त्यामुळे निर्बंध शिथिल होणार का, याची उत्सुकता आहे. तत्पूर्वी, आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी रविवारी काढलेल्या नव्या आदेशानुसार पुढील आदेश येईपर्यंत निर्बंध "जैसे थे' राहणार आहेत.

शहरातील निर्बंध शिथिल करावेत, अशा मागणीचा प्रस्ताव महापालिका आयुक्‍तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. शहरातील रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट, ऑक्‍सिजन बेडची उपलब्धता पुरेशा प्रमाणात असल्यासंदर्भातही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. पुढील दोन दिवसांत निर्णय अपेक्षित आहे.

- एन. के. पाटील, उपायुक्‍त, सोलापूर महापालिका

प्रस्तावातील ठळक बाबी...

  • शहरातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट आहे 1.7 टक्‍के

  • शहरातील एकूण ऑक्‍सिजन बेडपैकी 6.3 टक्‍के बेडसवर आहे रुग्ण

  • सद्य:स्थितीत शहरातील 95 रुग्णांवर सुरू आहेत उपचार; तीव्र, अतितीव्र लक्षणे असलेले रुग्ण कमीच

  • व्यापारी, खासगी कोचिंग क्‍लासेस, शाळा, हातावरील पोट असलेले मजूर, लघू उद्योजकांनी केली निर्बंध शिथिलतेची मागणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com