
सोलापूर : महापालिकेमध्ये लाड - पागे समितीच्या शिफारशीच्या वारसा हक्कानुसार आज (गुरुवार) ४८ कर्मचाऱ्यांना आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. शासनाने महापालिका व नगरपालिकांमध्ये कार्यरत असणाऱ्या सफाई कामगारांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी लाड -पागे समितीची स्थापना केली होती.