Solapur : अग्निशमन दलाने वाचविली साडेपाच कोटींची मालमत्ता; सोलापूर शहरात वर्षभरात ३५५ ठिकाणी आगीची घटना

महापालिकेच्या अग्निशमन दलाने २०२३-२४ या वर्षभरात महापालिका हद्दीतील एकूण ३५५ विविध ठिकाणी लागलेली आग आटोक्यात आणली तर महापालिका हद्दीबाहेरील १४ ठिकाणी लागलेली आग देखील आटोक्यात आणली.
municipal corporation fire brigade save 5 cr property of solapur city
municipal corporation fire brigade save 5 cr property of solapur citySakal

सोलापूर : महापालिकेच्या अग्निशमन दलाने २०२३-२४ या वर्षभरात महापालिका हद्दीतील एकूण ३५५ विविध ठिकाणी लागलेली आग आटोक्यात आणली तर महापालिका हद्दीबाहेरील १४ ठिकाणी लागलेली आग देखील आटोक्यात आणली.

महापालिका हद्दीतील व हद्दीबाहेरील अशी मिळून एकूण ३६९ ठिकाणी लागलेल्या आगीतील एकूण ५.५० कोटी रुपयांची मालमत्ता वाचवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे. महापालिका हद्दीत लागलेल्या एकूण ३५५ ठिकाणी लागलेल्या आगीमध्ये जवळपास ९ कोटी २९ लाख ९०हजार रुपयांची मालमत्ता भस्मसात झाली.

वर्षभरात ३५५ ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये ४ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यास अग्निशमन दलास यश मिळाले आहे. वर्षभरातील आग व अपघाताच्या घटनांमध्ये ११ जण जखमी तर ६ जण मृत्युमुखी पडले.

२०२३-२४ मध्ये महापालिका हद्दीत एकूण २२ अपघात ठिकाणी अग्निशमन दलाने मदतकार्य केले आहे, तर २२ ठिकाणी व्हीआयपी बंदोबस्ताच्या निमित्ताने आपली सेवा बजावली आहे. महापालिका हद्दीबाहेर लागलेल्या १४ विविध ठिकाणच्या आगीमध्ये जवळपास २ कोटी ४५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.

या १४ आगीच्या घटनांमध्ये ७५ लाख रुपयांचे साहित्य व मालमत्ता वाचवण्यास अग्निशमन दलाने यश प्राप्त केले आहे. सन २०२३-२४ वर्षात तीन अपघाताच्या ठिकाणी अग्निशमन दलाने मदत कार्य केले आहे.

महापालिका हद्दीबाहेरील वर्षभराच्या आग व अपघाताच्या ठिकाणी २ जणांचा मृत्यू तर ३ जण जखमी झाले आहेत. वर्षभरात अग्निशमन दलाने नऊ ठिकाणी व्हीआयपी बंदोबस्ताच्या निमित्ताने आपली सेवा बजावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com