From Birth Certificates to Funeral Pits: All Civic Services Now OnlineSakal
सोलापूर
Solapur Municipal Corporation: अंत्यविधीसाठी मनपाकडून खड्ड्यांची सेवा; जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व सुविधा ऑनलाइन; ‘व्हॉट्सॲप चॅट’ सुरू
From Birth Certificates to Funeral Pits: गेल्या अनेक वर्षांपासून एजन्सीमार्फत सुरू असलेले परिवर्तन ॲप महापालिका आयुक्तांनी बंद केले. महापालिकेच्या संगणक विभागाकडून स्वत:चे ‘माय सोलापूर’ हे ॲप विकसित केले. यावरून तक्रारींचे निवारण करण्याकरिता सरळ आणि सुटसुटीत अशी प्रक्रिया या नव्या ॲपमध्ये आहे.
सोलापूर : सोलापूर महापालिका ही डिजिटल सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत असून, १६४ पैकी ११६ सेवा ऑनलाइनद्वारे दिल्या जात आहेत. या सुविधा आणखी सहजसोपी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून व्हॉट्सॲप चॅट सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सेवांमध्ये प्रथमच अंत्यविधीसाठी आवश्यक खड्डा खोदण्याची सोय देखील महापालिकेने दिली आहे. त्यामुळे जन्मापासून मृत्यूपर्यंत लागणाऱ्या सर्व सुविधा महापालिकेने ऑनलाइन केल्या आहेत.