सोलापूर : स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी नगरपालिकेचे अभ्यास केंद्र

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन नगरपालिकेच्या वतीने या बाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता
Municipal study center for competitive examination solapur
Municipal study center for competitive examination solapur sakal

मंगळवेढा : दुष्काळी तालुक्यातील अनेक तरुणांनी या दुष्काळावर मात करत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले करिअर उभा केले असताना उदयोमुख तरुणांसाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या अभ्यास केंद्राच्या उद्घाटन करण्यात आले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन नगरपालिकेच्या वतीने या बाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता जिल्हा नियोजन मंडळ सदस्य अजित जगताप यांनीही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून या अभ्यास केंद्रासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी मागणी केली.

या मागणीची दखल घेत बांधण्यात आलेल्या या अभ्यास केंद्राचे उद्घाटन सेवानिवृत्त पोलिस उपायुक्त किसन गवळी यांचे शुभहस्ते तसेच उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते,मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव,गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, भारत नागणे,चंद्रकांत घुले, प्रवीण खवतोडे, ज्ञानेश्वर भगरे मुरलीधर घुले, ॲड.विनायक नागणे, सोमनाथ,बुरजे , मुझम्मिल काझी ,भारत आटकळे,सिद्धेश्वर घुले, शिवाजी शिंदे, डॅा.शरद शिर्के, सौरभ गुंड, प्रशांत काटे, मनोज पंडीत, दीपक कोकरे, सचिन सोनवणे, मधुकिरण डोरले, राजेश मुढे, सचिन वाघमारे, विलास बापू आवताडे, दामाजी पवार, विजय शिंदे आदी मान्यवरांसह परीक्षार्थी विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते यांनी प्रास्ताविकात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी मिळाल्यामुळे हे काम शक्य झाले असल्याचे सांगितले.तसेच अशाच पद्धतीने नगरपरिषदेने स्पर्धा परिक्षा केंद्रा कडे लक्ष द्यावे आवाहन केले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अजित जगताप यांनी या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विशेष सहकार्य केल्याचे नमूद केले तसेच इथून पुढच्या काळात देखील मंगळवेढ्याच्या विकासात कुठेही कमी पडणार नसल्याचे सांगितले. मुख्याधिकारी श्री निशिकांत परचंडराव यांनी या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर असल्याचे सांगितले.आभार प्रदर्शन विलास बापू आवताडे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com