Solapur news : उद्योग-व्यवसायातून महिलांनी स्वतःचा विकास करावा; डॉ. नभा काकडे

प्रा. डॉ. नभा काकडे; कुंभारीत महिला स्वयंरोजगार शिबिराचा समारोप
डॉ. नभा काकडे
डॉ. नभा काकडेesakal

सोलापूर : महिलांनी पुरुषांच्या कमाईवर अवलंबून न राहता, आत्मनिर्भर बनावे. वाढत्या महागाईच्या युगात मुलांचे पालन पोषण, मुलांचे शिक्षण, अन्न, वस्त्र व निवारा यासारख्या गरजाही भागवायच्या असतील तर कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. यासाठी मागणी जास्त व चांगला दर असलेल्या वस्तू महिलांनी तयार करून विकण्याचे कौशल्य आत्मसात करावे, असे मत ल.गो. काकडे एज्युकेशन फाउंडेशनच्या सचिवा प्रा. डॉ.नभा काकडे यांनी केले.

स्व. ल. गो. काकडे एज्युकेशन फाउंडेशन, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था आणि फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा यांच्यावतीने कुंभारी (ता.द. सोलापूर) येथे आयोजित महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिराच्या सांगता समारंभ प्रसंगी डॉ. नभा काकडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर होते.

डॉ. नभा काकडे
Solapur Crime News : माजी आमदारपुत्राची २५ लाखांची फसवणूक

व्यासपीठावर आकांक्षा सामाजिक कार्य संस्थेच्या संस्थापिका मीनाक्षी बिराजदार, व्यवसाय प्रशिक्षिका अन्नपूर्णा पाडमुखे, सहाय्यक प्रशिक्षिका संध्या मनसावाले, फॅमिली प्लॅनिंग सोलापूर शाखेचे शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड आदी उपस्थित होते.या पंधरा दिवसाच्या महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिरात नायलॉन दोरी झुला, हँगिंग शोपीस, आरसे, फर, टेडी, पर्स,

डॉ. नभा काकडे
Solapur Accident News : सोलापूर जिल्ह्यात सहा महिन्यांत ३९१ जणांचा अपघातात मृत्यू

कापडी व कागदी पिशवी, ताटावरचे लोकरीचे पडदे, अत्तर, उदबत्ती, मेणबत्ती, पायपुसणी, रुखवताच्या वस्तू, अँटिक वॉल पीस, फुलदाणी, जरदोजी हॅन्ड वर्क, हॅन्ड एम्ब्रॉयडरी, नऊवारी काष्टा साडी, ड्रेस, ब्लाऊज, मेहंदी, रांगोळी, पाण्यातील रांगोळी, साडी गोंडे इत्यादींचे वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिरात गावातील ७० महिला सहभागी झाल्या होत्या. प्रास्ताविक मीनाक्षी बिराजदार यांनी केले. सूत्रसंचालन विजय शिंदे यांनी केले. आभार कल्पना गडगडे यांनी मानले.

डॉ. नभा काकडे
Solapur : सांगोल्यासाठी पुरवणी निधी अर्थसंकल्पात ३५ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर; आमदार शहाजी पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com