
सोलापूर : विनयभंग, जबरी चोरी, खंडणी मागणे, दगडफेक, घातक शस्त्रांनी धमकावणे, जबर दुखापत पोचवणे, लोकसेवकाला त्यांच्या कर्तव्यापासून परावृत्त करणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या नाईंट्या ऊर्फ ओंकार संतोष नलावडे (वय २५, रा. सुंदराबाई डागा शाळेजवळ, बांध वस्ती, दमाणी नगर) याच्यावर पोलिस आयुक्तांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.