Solapur News: सहा हजार थकवून पाच हजारांची मदत; ही कसली दिवाळी! 'नमो शेतकरी'चा नववा, दहावा हप्ता रखडला; पीएम किसानच्या २४ व्या हप्त्याची प्रतीक्षा संपेना

PM Kisan 24th Installment and Namo Shetkari Payments Still Pending: शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पैसे मिळणार का? नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या हप्त्यांबाबत मोठा प्रश्न
Maharashtra Farmers Await Namo Shetkari Yojana Ninth and Tenth Installments and PM Kisan 24th Payment Before Diwali

Maharashtra Farmers Await Namo Shetkari Yojana Ninth and Tenth Installments and PM Kisan 24th Payment Before Diwali

sakal

Updated on: 

सोलापूर: नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हप्ते थकीत असताना दुष्काळी मदत म्हणून दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचे अग्रीम देण्याची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याची टीका होत आहे. राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचे नववा आणि दहावा हप्ता अद्याप मिळालेला नाही. या दोन हप्त्यांपोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे चार हजार रुपये मिळणे बाकी आहे. आता अकराव्या हप्त्याची वेळ जवळ आली असताना त्याबाबतही अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे थकीत मदतीचे काय, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com