Solapur : नाना पटोलेंच्या कार अपघाताची सखोल चौकशी करा; माढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने टेंभुर्णी पोलीसांना निवेदन

ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील एक बड्या नेत्याच्या गाडीला असा अपघात होणे म्हणजे संशयास्पद आहे.
nana patole car accident investigation congress committee submit letter to police
nana patole car accident investigation congress committee submit letter to policeSakal

टेंभुर्णी : भंडारा जिल्ह्यातील कारदा याठिकाणी 10 एप्रिल रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीस एका मालवाहू ट्रकने धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील एक बड्या नेत्याच्या गाडीला असा अपघात होणे म्हणजे संशयास्पद आहे.

या प्रकाराची सरकारने सखोल चौकशी करावी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सुरक्षेत वाढ देखील करण्यात यावी या मागणीचे निवेदन माढा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना देण्यात आले.

यावेळी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष संजय पाटील,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आदित्य जाधव, भटक्या विमुक्त जाती जमातीचे प्रदेश सचिव भीमराव बंडगर,टेंभुर्णी शहर अध्यक्ष मुकुंद ननवरे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष रफिक शेख,

युवक काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस प्रदीप तोडकर,जगन्नाथ पाटील,प्रवीण देशमुख,रमजान शेख, संजय वाघमोडे,बाळासाहेब माळी, आनंद मोरे , महेश माने , अजिंक्य उंबरकर,रोहन माने, सिद्धेश्वर ताटे,मल्हारी बाबर, आप्पासाहेब गवळी,मच्छिंद्र कांबळे, अभयसिंह पाटील,राहुल नवले, सागर कुटे,राज कदम,सचिन नवले, सचिन जाधव यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com