Narayan Rane : उद्योजक बनण्यासाठी अर्जासह हाक द्या मी मदत करेन; नारायण राणे

मंगळवेढा महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या कृषी उद्योजक मेळाव्याच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते
Narayan Rane will help to entrepreneur solapur mangalwedha politics
Narayan Rane will help to entrepreneur solapur mangalwedha politicssakal

मंगळवेढा : मी जनतेचा सेवक असून मंगळवेढा परिसरातील बेरोजगारी कमी करून उद्योजक निर्माण करण्यासाठी तुम्ही अर्जासह हाक द्या, मी मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मंगळवेढा येथे बोलताना दिली.

मंगळवेढा महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या कृषी उद्योजक मेळाव्याच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रा.शिवाजीराव सावंत होते,व्यासपीठावर अध्यक्ष अॅड सुजित कदम,माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,सचिव प्रियदर्शनी कदम-महाडिक,प्र.कुलगुरू राजेश गादेवार,डाॅ.सुभाष कदम,डाॅ.मीनाक्षी कदम,नाट्यपरिषद संचालक तेजस्विनी कदम,दिपक चंदनशिवे,पवन महाडिक,प्रणव परिचारक उपस्थित होते,

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री राणे म्हणाले की, सीमावर्ती भागातील मागासलेल्या मंगळवेढ्यातील तरूणांनी ज्याप्रमाणे मेहनत आणि परीश्रम यांची जोड दिल्यास माणूस काहीही करू शकतो, त्याप्रमाणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नऊ वर्षात देशाचा 10 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर आलाय,2030 साली 3 य्रा क्रमांकावर येण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

देशातील 6 कोटी 40 लाख उद्योग माझ्या कक्षेत आहेत,देशातील लोकांचे दरडोई उत्पन्न वाढावे,वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे.आपल्याला श्रीमंती गाठायची असेल मेहनत करावी लागेल,सोलापूर जिल्ह्य़ात खासगी व सहकारी 44 साखर कारखाने आहे राज्यात सर्वात साखर कारखाने असूनही दरडोई उत्पन्न कमी आहे. साखर कारखानदारांनी इतर प्रकल्प बनविले पाहिजे.तरच शेतकय्रांना मालाचे व कामगाराला चांगला पगार देवू शकतो. मी आमदार होण्यापूर्वी सिंधुदुर्गला पुर्वी गरीब म्हणायचे मला

दोन वर्षे द्या, गरीबी कमी करतो, हा शब्द दिला व त्यानंतर मासेमारीला प्रोत्साहन दिल्याने तिथले मासे मुंबई सह परदेशात मासे विकले जावू लागले. 1990 या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न 35 हजार साली होते या भागात आंबा फणस काजू या फळावर प्रक्रिया उद्योग सुरू झाल्याने

आता ते दोन लाखाच्या आसपास आहे,होलसेल मध्ये 5 रू किलोने घेतलेला आंबा,त्यावर पॅकिंग व ट्रान्स्पोर्ट करून मार्केटिंग करणारा 20 रू पेक्षा अधिक नफा कमावतो,हा भाग मागासलेला भाग म्हणून सांगण्यात अर्थ नाही मेहनतीने सिध्द केले पाहिजे ज्वारी,बाजरी, डाळिंब, संत्रा, अननस,ज्यूस जागतिक बाजारात चांगली किंमत आहे,घराघरात उद्योग झाल्यामुळे चीन महासत्ता होतो मग आपली मानसिकता प्रगती करण्याची असली पाहिजे.

पंतप्रधानानी 9 वर्षात 31 योजना दिल्या, कोरोना काळात कारखाने बंद पडले,रोजगार थांबले लोकांची उपासमार होऊ नये म्हणून 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिले.तरूणांनी आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करावेत.मंगळवेढ्यात उद्योजक निर्माण होण्यासाठी क्लस्टर मंजूर करेन,त्यासाठीची कागदपत्रे पुर्तता करावी, महिलांसाठी अनेक उद्योग आहेत.

त्यासाठी कर्ज व सबसिडी आहे.आधुनिक प्रगतीचे मार्ग कोणते,जगात वापरले जाणारे तंत्रज्ञान याची माहिती व प्रशिक्षण देण्याची तयारी आहे . प्रियदर्शनी कदम या प्रदेशात उच्चशिक्षित झाले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या भागांमध्ये उद्योजक व बेरोजगारी कमी करण्यासाठी मदत करण्याची भूमिका त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com