
सोलापूर : ७० फुट रोडवरील विक्रेत्यांना नियम व अटी घाला पण परवानगी द्या. वाहतूकीस अडथळा होऊ नये यासाठी नियम लागू करून व्यवसाय करण्याची मान्यता द्यावी. अतिक्रमण विभागाची कारवाई थांबवून संबंधित विभाग, विक्रेते व आयुक्तांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढावा, अशा मागणीचे निवेदन माजी आमदार नरसय्या आडम यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना देण्यात आले.