Navratri Festival 2023 : भेसळीचे कुंकू अपायकारच; रंगाच्या हव्यासापेक्षा हळदीचे सौभाग्यलेणेच उत्तम

सध्याला नवरात्रीच्या काळ सुरू असल्याने कुंकवाला बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते.
navratri
navratri sakal

सोलापूर - नवरात्रीनिमित्त बाजारपेठेत देवीच्या पूजा साहित्य खरेदीत हळद आणि कुंकू हे अत्यावश्यक मानले जाते. कुंकू हे सौभाग्याचं लेणं. पूजा विधीतील एक मंगल वस्तू. पण या कुंकवातही मोठ्या प्रमाणावर भेसळ होत आहे. पावित्र्याचे आणि मांगल्याचे प्रतीक असणाऱ्या कुंकवात रसायनांचा वापर होत आहे. असे रासायनिक कुंकू लावल्याने त्वचेवरती विविध दुष्परिणाम होतात.

सध्याला नवरात्रीच्या काळ सुरू असल्याने कुंकवाला बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. या कुंकवाचे दर ५० रुपये ते ४०० रुपये किलो असे असून जे स्वस्त आपली कुंकू आहे ते रासायनिकच असते. ते कपाळावर लावल्याने खाज येणे, पुरळ येणे असे त्वचा विचार उद्भवू शकतात.

त्यामुळे जनसामान्यांनी बाजारपेठेमध्ये कुंकू खरेदी करताना शक्यतो रासायनिक नसलेले व उच्च प्रतीचे कुंकू खरेदी केले तर उत्तम. साधा कुंकवाचा डाग शक्यतो लवकर निघत नाही. तर रासायनिक नसलेले कुंकू सहजपणे पुसता येते ही याची मुख्य ओळख म्हणता येईल.

navratri
Navratri 2023 : सहकाऱ्यांनी हॉस्टेलमध्ये लैंगिक शोषण केलं, प्रयत्नांनी बनली Commercial Tax Officer ; वाचा ट्रान्सजेंडर ऐश्वर्याची यशोगाथा

निरुपणकार सुधाकर महाराज इंगळे सांगतात की राम रावण युद्धावेळी रामभक्त हळदी व कुंकुमी या असुर स्त्रियांना मृत्यूसमयी प्रभू श्री रामाने दर्शन दिले. तसेच त्यांची रामा प्रतीची सेवा पाहून त्यांना आम्रवृक्षाच्या कोयरीच्या आकाराच्या पात्रात राहण्याचे वरदान दिले. तेच हळद कुंकू सौभाग्याचे लेणे म्हणून कपाळावर धारण करतील असे सांगितले. काहींच्या मते ही प्रथा आर्यांची आहे. काहीजण आर्यांनी ही प्रथा आर्यत्तराकडून घेतल्याचे मानतात.

संस्कृत भाषेमधील ''कुंकुमम'' वरून कुंकू हा शब्द आला. याचा अर्थ केशर असा होतो. महाभारताच्या आधीपासूनही तो अस्तित्वात असल्याचा पुराणात उल्लेख आहेत. दक्षिणेत गृहप्रवेशावेळी पशुबली दिल्यावर त्याच्या रक्ताचा टिळा नववधूस लावत नंतर कुंकू लावण्याची प्रथा आली असावी.

- ह. भ. प. सुधाकर इंगळे महाराज, निरूपणकार

navratri
Navratri 2023 : 50 हजार भाविक नतमस्तक; कुलस्वामिनी धनदाईदेवीच्या मंदिरात भाविकांची मांदियाळी

बाजारामध्ये अनेक प्रकारचे कुंकू आहे, परंतु त्यामधील चांगल्या प्रकारच्या कुंकवाला मागणी असते. डीलक्स व पिंजर यांचा यामध्ये समावेश होतो. किरकोळ विक्रीसाठी येणाऱ्या कुंकवात काही प्रमाणात रसायनांचा वापर असतो. अशा कुंकवाच्या वापराने कपाळाला खाज येऊन फोडही येतात.

प्रमोद अपशिंगे, एन. आर. सुगंधी दुकानाचे मालक

असे ओळखा शुद्ध कुंकू

शुद्ध कुंकू म्हणजे हळदीने केलेल्या पिंजर नामक कुंकवाला हळदीचा सुगंध असतो. तसेच ते पाण्यामध्ये टाकल्यावर काहीकाळ तरंगते. तर रासायनिक कुंकू पाण्यात टाकल्यावर पूर्ण पाणी लाल होते. यापेक्षाही शुद्ध कुंकवाला चुना लावला तर त्याचा रंग काळा होतो आणि रासायनिक कुंकवाला चुना लावला तर त्याचा रंग लाल होतो. अशा साध्या पद्धतीने कुंकवाची पारख करता येते असे आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य अशोक मंत्री यांनी सांगितले.

असे आहेत कुंकवाचे दर (किलोमध्ये)

साधे पंढरपुरी कुंकू - ५० रुपये

लक्ष्मी कुंकू -१२० रुपये

जवारी कुंकू - २०० रुपये

पिंजर कुंकू - ४०० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com