esakal | Solapur : नवरात्रोत्सवात मिरवणुकीला परवानगी नाहीच! जाणून घ्या नियमावली
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्रोत्सव

नवरात्रोत्सवातही गणेशोत्सवाप्रमाणेच निर्बंध राहतील, असे पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

नवरात्रोत्सवात मिरवणुकीला परवानगी नाहीच! जाणून घ्या नियमावली

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शारदीय नवरात्रोत्सवाला (Navratri festival) गुरुवारपासून (ता. 7) प्रारंभ होत असून, त्या दिवशी घटस्थापना होणार आहे. नवरात्रोत्सवातही गणेशोत्सवाप्रमाणेच निर्बंध राहतील, असे पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे (Commissioner of Police Ankush Shinde) यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता तिसऱ्या लाटेची शक्‍यता कायम आहे. या पार्श्‍वभूमीवर सावर्जनिक सण - उत्सवांवरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. पुढील आठवड्यात भाविकांसाठी मंदिरे खुली केली जाणार आहेत. परंतु, गर्दी होऊ नये याची दक्षता मंदिर समिती व स्थानिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना घ्यावी लागणार आहे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिक दर्शनासाठी आल्यानंतर त्यांची व्यवस्था वेगळी करावी लागण्याची शक्‍यता आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी सर्वांनीच खबरदारी घेऊन नियमांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे.

हेही वाचा: सोलापूर : तरीही मिळेना अहिल्यादेवींच्या अध्यासन केंद्राला निधी

सोलापूरकरांनी आतापर्यंत खूप सहकार्य केले असून आणखी काही महिने त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचेही पोलिस आयुक्‍त शिंदे म्हणाले. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे नियम यांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. दरम्यान, नवरात्रोत्सव मंडळांनी पोलिस आयुक्‍तांकडून निवेदने देऊन निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात आज (सोमवारी) किंवा मंगळवारी (ता. 5) बैठक घेतली जाणार आहे.

असे असणार निर्बंध...

  • सार्वजनिक ठिकाणी मंडप टाकण्यास बंदी; रस्त्यावरील रहदारीला अडथळा नकोच

  • नवरात्रोत्सवानिमित्त सार्वजनिक मिरवणूक काढता येणार नाही

  • मंदिर समिती व स्थानिक पोलिस ठाण्याचे अधिकारी करतील दर्शनाची व्यवस्था

  • मंदिरातील जागेची उपलब्धता पाहून एकावेळी किती भाविकांना दर्शनासाठी सोडायचे, याचे होईल नियोजन

  • कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर समितीने भाविकांसाठी करून द्यावी ऑनलाइन दर्शनाची सोय

'कोजागिरी'चा जिल्हाधिकारी घेतील निर्णय

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविक तुळजापूरला पायी चालत जातात. सोलापूरसह कर्नाटकातील भाविकांचाही त्यात सहभाग असतो. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही निर्बंध कायम राहण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यासंदर्भात उस्मानाबाद व सोलापूर जिल्हाधिकारी काही दिवसांत निर्णय घेतील, असेही सांगण्यात आले.

हेही वाचा: ''राफेल खरेदी ही शौर्याची नव्हे तर लाजीरवाणी बाब !''

कोरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे यंदाही नवरात्र महोत्सव साध्या पद्धतीनेच होईल. दर्शनासाठी भाविकांना जाता येईल, परंतु सर्वांच्या सुरक्षिततेसाठी कोरोनासंबंधीचे नियम पाळावे लागतील. सर्वांच्या सहकार्यातून शहर कोरोनामुक्‍त होईल, असा विश्‍वास आहे.

- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्‍त, सोलापूर

loading image
go to top