
-प्रमोद बोडके
सोलापूर : जिल्हा परिषदेवर स्वबळातून भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे कामाला लागले आहेत. त्यांचे विरोधक असलेल्या महाविकास आघाडीत मात्र सध्या सन्नाटा दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचा घोळ अद्यापही मिटला नाही. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नावालाच उरल्याने त्यांचे लक्ष महाविकासमधील मोठा भाऊ असलेल्या राष्ट्रवादीकडे लागले आहे. राष्ट्रवादीतील जिल्हाध्यक्षाचा तिढा सुटेना अन् महाविकासचा मेळ लागेना, अशीच स्थिती सध्या दिसत आहे.