

Umesh Patil’s Narrow Defeat Could Turn Costly for BJP’s Sachin Jadhav
Sakal
-राजकुमार शहा
मोहोळ : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या कुरुल जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील विरुद्ध भाजपाचे सचिन जाधव अशी काटे की टक्कर झाली. या निवडणुकीत उमेश पाटील यांचा 1303 मतांनी पराभव झाला. असे जरी असले तरी हा निसटता झालेला पराभव भाजपाला विचार करायला लावणारा आहे. उमेश पाटील हे कुरुल जिल्हा परिषद गटात गेटकेन उमेदवार. मात्र ते गेटकेन असूनही त्यांनी 9 हजार 871 मते मिळविली.हा निसटता पराभव सचिन जाधव यांना भविष्यात जाचक ठरणारा आहे. खुद्द कुरुल मधूनच उमेश पाटील यांना मताधिक्य आहे.