
सोलापूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आज प्रथमच पक्षाचे जिल्हा आणि शहर असे स्वतंत्र मेळावे झाले. प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी दुपारी ४ ते सायंकाळी ६ अशी दोन तासांची वेळ सोलापूरसाठी दिली. दोन तासांच्या दौऱ्यात सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीचे ठळक दर्शन झाले. विधानसभा निवडणुकीत अस्तित्व गमावलेल्या राष्ट्रवादीतील गटबाजीचे जुनेच दुखणे नव्याने ताजेतवाने झाले आहे.