Pandharpur Vidhansabha: माढ्यातून लढण्याचा अपप्रचार,पंढरपूरातूनच लढणार, अभिजीत पाटलांनी केलं स्पष्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे खा. शरद पवार यांनी मला पंढरपूर विधानसभेचा उमेदवार घोषण केल्यानंतर मी पंढरपूर विधानसभेची निवडणूक लढवणार आहे.
ncp sharad pawar group leader abhijit patil fight from pandharpur politics
ncp sharad pawar group leader abhijit patil fight from pandharpur politicsSakal

मंगळवेढा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे खा. शरद पवार यांनी मला पंढरपूर विधानसभेचा उमेदवार घोषण केल्यानंतर मी पंढरपूर विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. मात्र विरोधकाकडून मी माढ्यातून लढणार असा अपप्रचार केला जात असल्याची स्पष्टोक्ती विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिली.

मंगळवेढा येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासमवेत चहापाणी कार्यक्रमा दरम्यान पत्रकाराशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे विजय खवतोडे, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मुजमिल काझी,शिवसेना शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले,सुरेश कट्टे,वात्रटिकाकार शिवाजी सातपुते,आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की सध्या सत्ताधाऱ्याकडून पुन्हा सत्ता स्थापन करणाय्राच्या दृष्टिने सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांना छळण्याचे प्रयत्न सुरू आहेत.मला देखील तशा पध्दतीने छळण्याचे प्रयत्न सुरू आहे.

पण देशात काय चालू आहे जनतेला सर्व समजत आहे.सत्तेसाठी सुरू विरोधकाना छळण्य्च्या प्रयत्नातून जनतेमधून अधिक रोष निर्माण होत आहे हे सत्ताधाऱ्याच्या लक्षात येईना.कारण सध्या शेतकऱ्याना हमीभाव,पिक विमा,दुध दर या शेतकरी व सर्वसामान्य नागरिक महागाईने भरडला जात आहे.याकडे लक्ष द्यायला वेळ नाही.

जर 85 वर्षाचा योद्धा सर्व संकटाला मोठ्या धैर्याने सामोरे जात असेल तर आपण का मागे राहायचे या भूमिकेतून येणाय्रा सर्व संकटाला सामना करण्यासाठी सामोरे जायची मानसिकता तयार केली असल्याचे सांगत ज्या पध्दतीने आ.रोहीत पवारांना ज्या व्यवहाराशी अधिकचा संबंध नाहीत त्या व्यवहारातून त्यांना चौकशीच्या नावाखाली त्रास दिला जात आहे.त्यापध्दतीने आपल्याला सामोरे जावे लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com