

NCP (Sharad Pawar) leaders from Mangalwedha meeting Deputy CM Eknath Shinde to discuss the city’s pending development projects.
Sakal
मंगळवेढा : शहराच्या लोकसंख्या वाढीबरोबर हद्दीबाहेर बांधकामे वाढल्यामुळे त्यांना सोयी सुविधा करणे पालिकेला अडचणी ठरत आहे. म्हणून पालिकेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या हद्दवादवाढीचा प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित असून त्या प्रस्तावाला मान्यता द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.नगरपालिका निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने केलेली मागणी महत्त्वाची आहे पण या मागणीकडे सत्ताधारी पक्षाने का दुर्लक्ष का केले याची चर्चा शहारात सुरू झाली.