

Political Upset in Pandharpur Taluka as NCP Gains Upper Hand
Sakal
-भारत नागणे
पंढरपूर: पंढरपूर तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गटांपैकी भोसे, रोपळे, वाखरी, भाळवणी गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. तर कासेगाव गटातून तीर्थक्षेत्र विकास आघाडीने भाजपला धुळ चारली. या निवडणुकीमध्ये भाजपला गोपाळपूर, करकंब, टाकळी येथे यश मिळवता आले आहे. पंचायत समितीच्या १६ जागांपैकी आमदार पाटील- भालके आघाडीने ८ जागा जिंकल्या आहेत तर भाजपलाही ८ जागा मिळाल्या आहेत.