MLA Amol Mitkari: राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार:आमदार अमोल मिटकरी; 'स्थानिक संस्थांच्या निवडणुकीबाबत माेठ विधान'

NCP Goes Solo in Local Elections: महायुती म्हणून आम्ही वरिष्ठांच्या आदेश आले तर एकत्रित लढण्यास तयार आहोत, पण ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आमची ताकद आहे, त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आणि पक्ष म्हणून आम्ही स्वबळावर निवडणूक लढण्यास तयार आहोत.
Amol Mitkari
Amol Mitkarisakal
Updated on

पंढरपूर: आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून आम्ही लढण्यास तयार आहोत. पण, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे, त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढण्यास सज्ज असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे. निवडणुकांपूर्वीच महायुतीच्या नेत्यांनी स्वबळाची भाषा सुरू केली आहे. आमदार मिटकरी आज श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com