

NCP leaders discussing the non-BJP alliance strategy during the core committee meeting in Solapur district.
Sakal
सोलापूर : नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उद्यापासून (सोमवार, ता. १०) उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व अनगर नगरपंचायतीत भाजपच्या विरोधात कसे लढायचे? याची सोलापूर जिल्ह्यातील रणनीती येत्या दोन दिवसांत ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासोबत आज झालेल्या बैठकीत भाजप सोडून कोणासोबतही युती/आघाडी करण्याचा निर्णय झाल्यानंतर जिल्ह्यातील घडामोडींनाही वेग आला आहे.