

Candidature Tangle in Karmaj Likely to Break Today as NCP Focuses on Key Strongholds”
Sakal
सोलापूर: विधानसभा निवडणुकीत अस्तित्व हरवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पायाभरणी मानली जात आहे. जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाची पूर्ण मदार कुर्डुवाडी नगरपरिषद व अकलूज नगरपरिषदेवर असणार आहे. या दोन नगरपरिषदेत राष्ट्रवादी कशी कामगिरी करणार? यावर जिल्ह्याच्या नागरी भागातील राष्ट्रवादीचे अस्तित्व अवलंबून असणार आहे.