

NCP district president Umesh Patil says citizens and party workers firmly support NCP; keeps option open for alliance with Shiv Sena.
Sakal
सोलापूर : आगामी निवडणुका जिल्ह्यात महायुती म्हणून लढाव्यात अशी आमची इच्छा आहे. भाजपने स्वबळावर लढायचे ठरविल्यास आम्ही शिवसेनेसह त्या-त्या तालुक्यातील स्थानिक आघाड्यांनाही सोबत घेण्याबाबत प्रयत्न करू, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिली. मोहोळ आणि माढा तालुक्याचा डीएनए हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. या तालुक्यातील नेत्यांचा जरी भाजप प्रवेश झाला असला तरीही या तालुक्यातील सामान्य नागरिक, कार्यकर्ता हा राष्ट्रवादीसोबतच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.