Solapur Accident: 'नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचला ट्रकचालक'; सोलापूर-तुळजापूर रोडवर अपघात; थांबलेल्या डंपरला ट्रकची मागून धडक

Citizen alertness prevents serious collision on highway: तुळजापूरहून सोलापूरकडे येणाऱ्या ट्रक चालकाला तळे हिप्परगा येथील पुलाजवळ थांबलेल्या डंपरचा अंदाज आला नाही. बाजूने वाहने असल्याने ट्रक चालक त्याच्या लेनने जात होता. त्यावेळी डंपरला ट्रकची मागून जोरात धडक बसली.
Truck narrowly avoids collision with stationary dumper on Solapur-Tuljapur road, thanks to alert citizens and driver vigilance.

Truck narrowly avoids collision with stationary dumper on Solapur-Tuljapur road, thanks to alert citizens and driver vigilance.

Sakal

Updated on

सोलापूर : सोलापूर-तुळजापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचा (जीजे २१, वाय ३९५६) तळे हिप्परगा येथील पुलावर रविवारी (ता. १९) सकाळी साडेदहाच्या सुमारास अपघात झाला. रस्त्यावर थांबलेल्या डंपरला ट्रकची मागून धडक बसली. त्यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर त्याठिकाणी जमलेल्या नागरिकांनी ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढून दवाखान्यात दाखल केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com