
सोलापूर : कोरोनाचे ६८९ नवीन रुग्ण
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात ६८९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यातील ५७५ रुग्ण ग्रामीण भागातील तर ११४ रुग्ण हे सोलापूर महापालिका हद्दीतील आहेत. कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालातून समोर आले आहे. त्यातील दोन जण हे ग्रामीण भागातील तर एक जण महापालिका हद्दीतील आहे.
हेही वाचा: Goa: भाजपचे ‘कॅथलिक कार्ड’ अन् लोबोंची धूर्त खेळी... कळंगुटमध्ये बाजी कोणाची?
सिद्धापूर (ता. मंगळवेढा) येथील ३५ वर्षीय पुरुषाला २५ जानेवारी रोजी अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान २६ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता त्यांचे निधन झाले. संगेवाडी (ता. सांगोला) येथील ७० वर्षीय महिलेला २४ जानेवारी रोजी पंढरपूर येथील जिल्हा उपरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. २५ जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. महापालिका हद्दीतील साखरपेठ परिसरातील ८९ वर्षीय महिलेला २४ जानेवारी रोजी अश्विनी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना दहा वर्षापासून हृदयविकाराचा त्रास असून शस्त्रक्रिया करण्यात आली होती. उपचारादरम्यान २५ जानेवारी रोजी त्यांचे निधन झाले आहे. जिल्ह्यातील ३९५ जणांनी कोरोना वर मात केली आहे. त्यातील २८३ जण ग्रामीण भागातील तर ११२ जन हे महापालिका हद्दीतील आहेत. म्युकरमायकोसने बाधित झालेले तीन रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
Web Title: New 689 Corona Patients Solapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..