
सोलापूर : परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसापूर्वी पंढरपूर दौऱ्यावर असताना अचानक एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याला भेट दिली. तेथे असलेल्या प्रवाशांच्या सोयी-सुविधाबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या एसटी महामंडळाने त्वरित एक परिपत्रक काढून संपूर्ण राज्यातील अशा हॉटेल-मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता जारी केली आहे.