
सोलापूर: अजनी (नागपूर)-पुणे वंदे भारतला रविवारी प्रारंभ झाला असून या गाडीमुळे सोलापूरकरांना एक दिवसांत नागपूरला जाण्याची सोय झाली आहे. सोलापूरहून मुंबई सीएसटी सुपरफास्ट एक्स्प्रेसने सकाळी ७. ३० पूर्वी दौंड स्टेशनवर पोचल्यास पुणे-नागपूर वंदे भारतने सायंकाळपर्यंत आता नागपूरला पोचता येणार आहे.