
सोलापूर : भारतीय दंड संहिता (आयपीसी) बदलून भारतीय न्याय संहितेचा (बीएनएस) अंमल सुरू झाला. १ जुलै २०२४ पासून ‘बीएनएस’चा अंमल सुरू झाला. तत्पूर्वी, सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याबद्दल प्रशिक्षित करण्यात आले. त्यानंतरही बदललेल्या कलमांची माहिती अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्हावी म्हणून माहिती पुस्तिका आणि नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोकडून (एनसीआरबी) मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले. तरीदेखील, सद्य:स्थितीत अनेक अधिकारी व अंमलदारांना बदललेली कलमे माहितच नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे.