ग्रामपंचायत निवडणूक, पोलिस आयुक्त म्हणाले..! अर्ज भरताना इच्छुकांसोबत ५ जणांनाच एन्ट्री

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला २८ नोव्हेंबरपासून सुरवात होणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व न्याय वातावरणात पार पडावी, या हेतूने पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी इच्छुक उमेदवारांसाठी स्वतंत्र आदेश काढले आहेत.
cp rajendra mane
cp rajendra manesakal

सोलापूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरवात होणार आहे. निवडणूक शांततेत व न्याय वातावरणात पार पडावी, या हेतूने पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी स्वतंत्र आदेश काढले आहेत. त्यानुसार अर्ज भरायला येताना उमेदवार व सूचकासह केवळ पाच लोकांनाच त्याठिकाणी प्रवेश असणार आहे.

जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची मुदत ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात संपणार आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २८ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणूक प्रक्रिया उत्तर तहसील कार्यालयात सुरु आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून पोलिस आयुक्तांनी उत्तर तहसील कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार तहसील कार्यालयाच्या आतील परिसरात मोबाईल, टॅब्लेट, संगणक, पेजर तथा संदेशाची देवाण-घेवाण करणारी विद्युत उपकरणे हाताळता येणार नाहीत. तंबाखूजन्य पदार्थ, आगपेटी, लायटर तथा अन्य ज्वालाग्रही पदार्थ आत नेता येणार नाहीत. निवडणूक विषयक अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, निवडणूक कार्यालयाने पास दिलेल्या व्यक्तींशिवाय अन्य कोणालाही प्रवेश असणार नाही. कोणतेही शस्त्र जवळ बाळगता येणार नाही. पासधारक वाहनांशिवाय अन्य वाहनांना तेथे ‘नो एन्ट्री’ असेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

निकालानंतर मिरवणूक नकोच...

ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाल्यानंतर तहसील कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात गुलाल उधळणे, मिरवणुका काढणे आणि घोषणा देण्यावर बंदी असेल, असेही पोलिस आयुक्तांनी आदेशातून स्पष्ट केले आहे. त्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. माध्यम प्रतिनिधींना ओदशातून सूट आहे. आदेशाचा भंग केल्यास भारतीय दंड विधानाचे कलम १८८अंतर्गत कारवाई होईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा ते ७ डिसेंबरपर्यंत हा आदेश लागू असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com