

Traditional Cow Calf Forecast Hints at Abundant Rains and Rising Prices
sakal
सोलापूर : ‘यंदा वरुणराजाची कृपा कायम राहणार असून पाऊस-पाणी समाधानकारक होईल. मात्र बाजारपेठेत लाल वस्तूंची आग लागेल आणि सर्वच क्षेत्रांत अस्थिरतेचे सावट असेल,’ असा भविष्यवेधी कौल शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील मानाच्या भाकणूक विधीतून देण्यात आला. बुधवारी (ता.१४) रात्री उशिरा पार पडलेल्या या विधीने लाखो भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते.