सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग ! लग्नाच्या आमिषातून विवाहितेवर अत्याचार

सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग ! लग्नाच्या आमिषातून विवाहितेवर अत्याचार
Crime
CrimeCanva
Summary

सासऱ्याने सुनेचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याची घटना सोलापुरात घडली.

सोलापूर : सासऱ्याने सुनेचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याची घटना सोलापुरात घडली. याप्रकरणी पीडित महिलेने फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून चार जणांविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वी, घरात कोणी नसताना सासऱ्याने सुनेचा हात पकडत तिचा विनयभंग केला. तसेच सासरा, सासू, दीर व पतीने हुंडा मागत छळ केला. विवाहानंतर माहेरून पैसे घेऊन ये म्हणून सासरच्या लोकांनी वारंवार शिवीगाळ करत त्रास (harassment) दिला. घरात कोणी नसताना सासऱ्याने झोंबाझोंबी केली. पतीला सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु पती ऐकणार नाही म्हणून त्यांना काही सांगितले नाही, असेही फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक काळे या घटनेचा तपास करीत आहेत.

Crime
घरफोडी! दोन सराईत गुन्हेगारांना अटक; 2.84 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

लग्नाच्या आमिषातून विवाहितेवर अत्याचार

विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी तेजस राहुल बनसोडे (रा. भवानी पेठ) याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, 20 वर्षीय पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. तिच्या विवाहानंतर तेजसने ओळख वाढविली. त्यानंतर त्याने "तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे' असे आमिष दाखवले. त्याने त्या विवाहितेला मोबाईल घेऊन दिला. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार करताना नको त्या अवस्थेतील फोटो काढले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक मांजरे हे तपास करीत आहेत.

लहान मुलांच्या भांडणातून मारहाण

लहान मुलांच्या भांडणावरून एकाच्या डोक्‍यात फरशी घालून जखमी करून दमदाटी केल्याची संतोष नगरात घडली. याप्रकरणी प्रशांत वसंत भोसले यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून कोंडीबा मारुती नवगिरे, अनिता कोंडीबा नवगिरे, आदित्य कोंडीबा नवगिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक मस्के हे तपास करीत आहेत.

चहाच्या गाडीवरून मोबाईल लंपास

बाळे ब्रिजजवळ चहाच्या गाडीवर मोबाईल ठेवला. त्यावेळी चोरट्याने तो मोबाईल लंपास केल्याची घटना बाळे ब्रिज या ठिकाणी घडली. शबाना गुलजार शेख (रा. सम्राट चौक) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी शबाना शेख यांनी बाळे ब्रिजजवळील चारचाकी चहाच्या गाडीवर आपला मोबाईल ठेवला. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने तो चोरून नेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस नाईक शिर्के हे तपास करीत आहेत.

Crime
रड्डे परिसरात वाघाची अफवा तर खुनेश्‍वरमध्ये बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला !

घरातून मोबाईल अन्‌ लॅपटॉप पळविला

चोरट्याने अक्‍कलकोट रोडवरील पद्मानगरातील घरातून मोबाईल व लॅपटॉप चोरून नेल्याची फिर्याद पूजा विजय शिंदे यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली. पूजा शिंदे यांचे पती विजय शिंदे हे त्यांच्या मुलीला खासगी कोचिंग क्‍लासला सोडायला गेले होते. त्या वेळी घरात चोरट्याने प्रवेश केला. त्याने घरातील मोबाईल व लॅपटॉप चोरून नेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक खांडेकर हे तपास करीत आहेत.

ट्रान्सफॉर्मरमधून ऑईलची चोरी

चोरट्याने सम्राट चौक परिसरातील मात्रे मळ्यातील ट्रान्सफॉर्मरमधून ऑईल चोरून नेऊन ट्रान्सफॉर्मर खराब केल्याची फिर्याद सुजित दत्तात्रय नागणे (रा. धानेश्‍वरी नगर, वसंत विहार) यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली. त्यावरून पोलिसांनी एका अनोळखी व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर चोरट्याने खराब केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. पोलिस नाईक नवले हे तपास करीत आहेत.

Crime
'राज्यसेवा पूर्व'चा निकाल तयार ! जागा वाढीबद्दल मंगळवारी निर्णय

शेळगीत घरफोडी; रोकड अन्‌ दागिन्यांची चोरी

शेळगी परिसरातील प्रियांका नागेश हौसे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने घरातील 6 हजार 970 रुपये आणि चांदीचे दागिने चोरल्याची घटना 11 ते 12 ऑगस्ट दरम्यान घडली. याप्रकरणी हौसे यांनी जोडभावी पेठ पोलिसांत फिर्याद दिली आहे. दरम्यान, फिर्यादीच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटातून रोकड व चांदीचे दागिने चोरून नेले. फिर्यादीच्या घराशेजारील माणिक सदाशिव बडवणे यांच्याही घरात चोरट्याने डल्ला मारला, असेही फिर्यादीत नमूद आहे. पोलिस नाईक नवले हे तपास करीत आहेत.

दुचाकीची समोरासमोर धडक

दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एकजण जखमी झाला असून त्याच्या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हणमंत राजाराम लिंबोळे (रा. रविवार पेठ) पोलिसांत फिर्याद दिली. तत्पूर्वी, अनोळखी दुचाकीस्वाराने पासिंग न झालेल्या दुचाकीवरून अतिवेगाने लिंबोळे यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात लिंबोळे हे जखमी झाले आहेत. पोलिस हवालदार गायकवाड हे तपास करीत आहेत.

शेतासाठी कामगार देतो म्हणून 70 हजारांची फसवणूक

शेतासाठी कामगार पुरवितो म्हणून विश्‍वास संपादन करीत 70 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सुरेश धोंडीबा खंदारे (रा. चुंगी, ता. अक्कलकोट) याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अनंत व्यंकटराव क्षीरसागर (रा. लक्ष्मी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. तत्पूर्वी, संशयित आरोपीने क्षीरसागर यांना, तुमच्या शेतीसाठी कामगार पुरवितो म्हणून फसविल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. पोलिस नाईक भोसले हे तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com