esakal | जॉब देतो, मुलांनाही सांभाळतो म्हणून विवाहितेवर अत्याचार !
sakal

बोलून बातमी शोधा

जॉब देतो, मुलांनाही सांभाळतो म्हणून विवाहितेवर अत्याचार

मी तुझ्या मुलांचा सांभाळ करतो असे म्हणून संशयित आरोपी नागनाथ वामन राठोड याने जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

जॉब देतो, मुलांनाही सांभाळतो म्हणून विवाहितेवर अत्याचार !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : हॉटेलमध्ये मॅनेजमेंट (Hotel Management) या पदावर नोकरीला लावतो, तुझ्यासोबत विवाह करतो, तू तुझ्या नवऱ्याला सोडचिठ्ठी दे, मी तुझ्या मुलांचा सांभाळ करतो असे म्हणून संशयित आरोपी नागनाथ वामन राठोड याने जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित (Crime) केले. त्यानंतरही विवाह केला नाही, अशी फिर्याद एका महिलेने अक्‍कलकोट (Akkalkot) उत्तर पोलिसात (Police) केली. पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. परंतु, घटनेपूर्वी दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध होते, फिर्यादीने हा पूर्वनियोजित कारस्थान करून खोटा गुन्हा दाखल केल्याचा युक्‍तिवाद राठोडच्या वकिलांनी केला. तो युक्‍तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशील यांनी संशयित आरोपीला 15 हजारांच्या जातमुचलक्‍यावर अटकपूर्व जामीन दिला. राठोडतर्फे ऍड. आसिफ जमादार, ऍड. हेमंतकुमार साका, ऍड. प्रसाद संकद, ऍड. अक्षय जानकर यांनी काम पाहिले.

हेही वाचा: अक्कलकोटमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई! 20 लाखांचा; दहा वाहने जप्त

नगरसेवक शेजवाल यांना अटकपूर्व जामीन मंजूर

महापालिकेचे नगरसेवक मनोज शेजवाल यांना घरगुती गॅसचा अवैध साठा केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला. 6 जुलैला गुडलक हॉटेलसमोरील रेल्वे विभागाच्या मालकीच्या जागेत पोलिसांनी छापा टाकून गणेश शिवाजी पांढरे यांच्याकडून 38 गॅस टाक्‍यासह अन्य मुद्देमाल जप्त केला. शेजवाल यांच्या सांगण्यावरून हा व्यवसाय सुरू केल्याचे पांढरे यांनी सांगितले. त्यावरून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अटक टाळण्यासाठी नगरसेवक शेजवाल यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने तो फेटाळल्यानंतर त्यांनी ऍड. रितेश थोबडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. अर्जदार हा घटनेवेळी त्या ठिकाणी हजर नव्हता, त्याचा या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचा युक्तिवाद ऍड. थोबडे यांनी मांडला. तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी 25 हजारांच्या जातमुचलक्‍यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.

जीवे ठार मारण्याच्या प्रकरणात चौघांना अटकपूर्व जामीन

हराळवाडी (ता. मोहोळ) येथील माजी सरपंच रावजी विठ्ठल शेळके, दत्ता वाल्मीक शेळके, संजय गजेंद्र शेळके, भानुदास गजेंद्र शेळके, बाळासाहेब वाल्मीक शेळके यांच्याविरुद्ध राजकुमार शेळके व सविता शेळके या दोघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मंद्रूप पोलिसांत दाखल झाला. त्यानंतर अटक टाळण्यासाठी संशयित आरोपींनी ऍड. किरण सराठे यांच्या वतीने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. वकिलांचा युक्‍तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी 15 हजारांच्या जातमुचलक्‍यावर चौघांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.

हेही वाचा: वाद्यांच्या तालात ओबीसी मेळावा रंगला, मात्र कोरोना नियमांचा फज्जा उडाला

ओबीसी मेळाव्यात सोन्याची चेन चोरीला

जुळे सोलापूर परिसरातील गंगा लॉन येथील ओबीसी मेळाव्यात चोरट्याने 84 हजारांची सोन्याची चेन चोरली, अशी फिर्याद ज्ञानेश्‍वर काळे (रा. प्रतीक्षा बंगलोज, जानकरनगर जवळ, लक्ष्मी पेठ) यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. मेळाव्याला मोठी गर्दी असल्याने चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन हे कृत्य केल्याचेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले. पोलिस नाईक बर्हिजे हे त्या चोरट्याचा शोध घेत आहेत.

कोर्टात दावा दाखल केल्याने मारहाण

तू आमच्याविरुद्ध कोर्टात दावा दाखल का केला, म्हणून दोघांनी मारहाण केली, अशी फिर्याद जमिला उस्मान शेख (रा. विजयलक्ष्मी नगर, नई जिंदगी) यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली. त्यानुसार म. हनिफ म. शकील शेटे, नशिमा म. शकील शेटे (दोघेही रा. नवीन विडी घरकुल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तत्पूर्वी, त्या दोघांनी नात घरी असताना घरासमोर येऊन शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर त्यांनी हाताने, लाथाबुक्‍क्‍यांनी व लाकडी दांडक्‍याने मारहाण केली, असेही फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोलिस हवालदार पवार हे करीत आहेत.

loading image
go to top