esakal | हुंडा नको मामा, तुमची पोरगी मला द्या ! "लग्नाळूं'ना नवरी मिळणे झाले अवघड
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage

हुंडा नको मामा, तुमची पोरगी द्या मला ! लग्नाळूंना नवरी मिळणे झाले अवघड

sakal_logo
By
रमेश दास

एकवेळ अशी होती की मुलीचं लग्न करायचं म्हटलं की लाखोंचा हुंडा आणि करणी-धरणी याच्या ओझ्याखाली मुलीचा बाप दबून जायचा.

वाळूज (सोलापूर) : एकवेळ अशी होती की मुलीचं लग्न करायचं म्हटलं की लाखोंचा हुंडा आणि करणी-धरणी याच्या ओझ्याखाली मुलीचा बाप दबून जायचा. मात्र आज कोरोना (Covid-19) आणि टाळेबंदीने (Lockdown) हे सर्व चित्रच बदलले आहे. लाखोंचा हुंडा घेणारे वरपिता आता मात्र "माझ्या पोराला हुंडा आणि करणी नको, फक्त पोरगी आणि नारळ द्या' म्हणून मुलीच्या वडिलांच्या मागे लागले आहेत. (No one gave a girl for marriage to the youths who became unemployed due to corona)

हेही वाचा: खरीप हंगामाच्या पीक विम्याची मुदत 15 जुलैपर्यंत !

गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोविडमुळे विविध खासगी कंपन्यांतील कर्मचारी कपातीमुळे असंख्य मुलांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळले आहे. त्यामुळे नोकऱ्या धोक्‍यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील अनेक मुले शहरांमधील विविध कंपन्यांमध्ये काम करीत होती. मात्र टाळेबंदीमुळे अनेक छोट्या- मोठ्या कंपन्या बंद पडल्या तर काहींनी कर्मचारी संख्या कपात केली. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. परिणामी लग्नाचे वय उलटून गेले तरी या नोकरी गेलेल्या मुलांना मुलगी द्यायला मुलीचे वडील आता राजी होत नाहीत. त्यामुळे एकवेळ अशी होती, की हुंडा देऊन लाखोंची करणी करणारे वरपिता आता मात्र "माझ्या पोराला हुंडा आणि करणी नको, फक्त पोरगी आणि नारळ द्या' म्हणून मुलीच्या वडिलांच्या मागे लागले आहेत. मात्र मुलीचे वडील मुलगी द्यायला तयार नाहीत. लग्नाचे वय उलटून गेलेल्या मुलांचे कुटुंबीय "तुम्ही एक रुपाया हुंडा देऊ नका, उलट आम्हीच लग्नाच्या खर्चासाठी तुम्हाला पैसे देण्यास तयार आहेत, फक्त पोरगी आणि नारळ द्या' असे म्हणत आहेत. मात्र मुलीचे वडील काही तयार होत नाहीत. त्यामुळे गावोगावी लग्नाळू मुलांची संख्या वाढत चालली आहे.

हेही वाचा: मराठा समाज आरक्षणाचा तो 'भाजपमय आक्रोश'!

अनेकांचे पितळ पडले उघडे

प्रत्येक मुलीच्या वडिलांना वाटते की, आपल्या लाडक्‍या मुलीला लग्नासाठी नोकरदार स्थळ मिळावे. सरकारी नसेना का निदान पुणे, मुंबईला कंपनीत असला तरी चालेल. ज्या मुलांना शिकून सरकारी नोकरी मिळत नाही, त्यामुळे ज्यांचं लग्न जमत नाही, अशा कुटुंबातील मुलांना पुणे (Pune), मुंबई (Mumbai)सारख्या शहरात खासगी कंपनीत पंधरा- वीस हजारांवर नोकरी लागते. पोरगा कंपनीत आहे म्हणून मुलीचे वडील मुलगी द्यायला तयार होत असत. लग्न झाले की चार- सहा महिन्यात मुलगा कंपनीतील नोकरी सोडून गबाळ गुंडाळून गावी येऊन शेती करीत असत. त्यामुळे मुलीच्या वडिलांना कंपनीतील नोकरी बघून मुलगी दिल्याचा पश्‍चात्ताप होत असे. आता कोरोना संसर्गाच्या परिणामामुळे छोट्या- मोठ्या कंपन्या बंद झाल्या किंवा त्यांनी कर्मचाऱ्यांची संख्या कमी केल्याने लग्न जमत नसलेल्यांचं पितळ उघडे पडले आहे.

loading image