
“NCP (SP) leader Adv. Balasaheb Patil urges fair probe in Kurdu Murum case, appeals not to politicize the issue.”
Sakal
टेंभुर्णी : कुर्डू येथील मुरूम उपसा प्रकरणामध्ये काहीजण जाणीवपूर्वक राजकारण आणत आहेत. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील पूर्ण कुर्डू गावाला उद्देशून काहीही बोलले नाहीत, त्यांचा तसा उद्देश ही नव्हता. यामध्ये कोणाला तरी टार्गेट करून प्रशासनावर दबाव आणण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचे माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.