
मोहोळ : शक्तिपीठ महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा प्रकल्प ८६ हजार ३०० कोटींचा आहे, मात्र दीड लाख कोटी रुपये जरी याची किंमत झाली तरी तो पूर्ण होईल की नाही याची खात्री नाही. विकासाला आमचा विरोध नाही, परंतु आमच्या थडग्यावर विकासाचे मनोरे बांधू नका. या प्रकल्पामुळे ५५ हजार शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. त्यासाठी या महामार्गाला ताकदीने विरोध करा, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.