
Flood fury in North Solapur: Two motorcycles washed away from Telgaon bridge after heavy rains.
Sakal
उ. सोलापूर : रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असतानाही ओलांडून जाण्याचे धाडस दुचाकीस्वारांना अंगलट आले. गुरुवारी (ता. ११) पहाटे सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे देगाव ओढ्याला पूर आला आहे. या पुराचे पाणी डोणगाव- तेलगाव रस्त्यावरून वाहू लागले आहे. यावेळी दोन दुचाकीस्वारांनी वाहत्या पाण्यातून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाण्याच्या प्रवाहामुळे दोन दुचाकी वाहने वाहून गेली.