esakal | उत्तर तालुक्यात अतिवृष्टी; शेतकरी पंचनामा आदेशाच्या प्रतिक्षेत
sakal

बोलून बातमी शोधा

rain

उत्तर सोलापूर तालुक्यात सध्या गेल्या महिन्यातभरात अधून-मधून पाऊस दमदार बरसला आहे.

उत्तर तालुक्यात अतिवृष्टी; शेतकरी पंचनामा आदेशाच्या प्रतिक्षेत

sakal_logo
By
दयानंद कुंभार

वडाळा (सोलापूर): उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या आठवडाभरात पावसाची अतिवृष्टी झाली. यामध्ये वडाळा रानमसले, कळमण, पडसाळी, कौठाळी, गावडी दारफाळ, नान्नज-मोहीतेवाडीसह बहुतांश भागात शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात सध्या गेल्या महिन्यातभरात अधून-मधून पाऊस दमदार बरसला आहे. यामुळे कांदा, सोयाबीन, उडीद, मका, तुर, भाजीपाला, टोमॕटो, ढोबळी मिरची आदी पिकांना सुरुवातीस पोषक वाटणारा पाऊस शनिवारी मात्र खरीप पिकांचा कर्दनकाळ ठरला आहे. यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: वडाळा रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराची चौकशी! सिव्हिल सर्जनचे आदेश

अतिवृष्टीमुळे उत्तर तालुक्यात ओढे नाले बंधारे विहीरी तुटुंब भरले आहेत. याबाबत 'दै.सकाळ' ने सर्वप्रथम सविस्तर वृत्त देऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न मांडला. यामुळे शेतकरी 'सकाळ'ला धन्यवाद देत आहेत. याबाबत तहसिलदार जयवंत पाटील यांनी 'सकाळ' च्या वृत्ताची दखल घेतली आहे. तहसिल कार्यालयाकडून प्राथमिक स्वरुपात माहिती संकलित केली आहे. तसेच उत्तर सोलापूर कृषी विभागाकडूनही अतिवृष्टीबाबत अहवाल मागविला आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास दुरध्वनी वरुन कळविली आहे. तरी येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकांऱ्याकडून नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याचे आदेश येण्याची शक्यता आहे. अशी माहिती तहसिलदार जयवंत पाटील यांनी 'सकाळ' शी बोलताना दिली.

"गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टीमुळे कांदा, सोयाबीन, उडीद इतर खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी शासनाने त्वरीत पंचनामे करुन ठोस आर्थिक मदत द्यावी."

- रामचंद्र महादेव गरड, शेतकरी रानमसले ता. उ. सोलापूर

हेही वाचा: सुरक्षारक्षक देतोय केसपेपर! वडाळा ग्रामीण रुग्णालयात क्लार्कची मनमानी

यंदा उत्तर तालुक्यात पावसाची तुफान बॅटिंग

जून ते ऑगस्ट मध्ये सर्वच मंडाळात पावसाने सरासरी ओलांडली. शेळगी मंडलात सरासरीपेक्षा 112 टक्के अधिक, मार्डी मंडलात सरासरी पेक्षा 125 टक्के अधिक, तिर्हे मंडलात सरासरी पेक्षा 107 टक्के अधिक, सोलापूर मंडलात 137 टक्के अधिक, वडाळा मंडलात सरासरी पेक्षा 130 टक्के अधिक पाऊस पडल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.

सप्टेंबर महिन्यात वडाळा मंडळात सर्वाधिक पाऊस

सप्टेंबर महिन्यात शेळगी मंडळात 15 टक्के कमी, तिर्हे मंडळात सरासरी पेक्षा सरासरी पेक्षा 22 टक्के कमी पाऊस पडला आहे. सोलापूर मंडळात सरासरी नुसार तर मार्डी मंडळात सरासरी पेक्षा 35 टक्के अधिक पाऊस पडला असून वडाळा मंडळात सरासरीपेक्षा तब्बल 61 टक्के सर्वाधिक पाऊस बरसला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात एकूण सरासरी पेक्षा आतापर्यंत 123 टक्के पाऊस पडल्याची नोंद असल्याचे उत्तर सोलापूर तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ यांनी माहिती दिली.

loading image
go to top